रेडिमेड कपड्यांचा टेण्ड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रेडिमेड कपड्यांचा टेण्ड
रेडिमेड कपड्यांचा टेण्ड

रेडिमेड कपड्यांचा टेण्ड

sakal_logo
By

प्रमोद जाधव, अलिबाग
सणासुदीचा हंगाम सुरू झाल्‍याने जिल्‍ह्यात नवनवीन कपडे खरेदीला सुरुवात झाली आहे. पूर्वी कपडे शिऊन घालण्याला पसंती दिली जायची. मात्र आता रेडिमेड कपड्यांचा ट्रेण्ड आला आहे. शिवाय रेडिमेड कपडे तुलनेने स्‍वस्‍त पडत असल्‍याने ग्राहकांचा खरेदीकडे कल वाढला आहे.
जून ते नोव्हेंबर या कालावधीत वटपौर्णिमा, रक्षाबंधन, नारळीपौर्णिमा, श्रीकृष्ण जन्माष्टमी, गोपाळकाला, गणेशोत्सव, दिवाळी, दसरा असे अनेक सण साजरे केले जातात. या कालावधीत वेगवेगळ्या रंगांचे कपडे खरेदी करून आनंदोत्सव साजरा केला जातो. पूर्वी सणासुदीच्या महिनाभर आधी शर्ट, पॅन्ट, ड्रेस मटेरियलचे कापड आणून ते शिवायला दिले जायचे, मात्र गेल्‍या तीन-चार वर्षांत रेडिमेड कपड्यांचा ट्रेण्ड वाढला आहे.
मोठ्या शहरांबरोबरच आता जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागात रेडिमेड कपड्यांची दुकाने सुरू झाली आहेत. यात नामांकित ब्रॅण्ड असलेल्‍या कपड्यांचे शो-रूम, लग्‍नसोहळ्यांच्या खरेदीसाठी खास दुकाने, फॅशन स्‍टुडिओ, बुटिकचा समावेश आहे. रेडिमेड कपडे खरेदी केल्‍यावर हव्या त्‍या मापात अवघ्‍या काही मिनिटांत अल्‍टर करून मिळतात. त्‍यात सण-उत्‍सवात वेगवेगळ्या सवलती जाहीर केल्‍या जातात.
एकावर एक फ्री, पैठणीवर बॅग फ्री, कूपन्स दिले जात असल्‍याने ग्राहकांकडून खरेदीला पसंती मिळत आहे.

पूर्वी सणासुदीच्या काळात टेलरकडून शिवलेले कपडे ग्राहक परिधान करीत होते; परंतु तीन-चार वर्षांपासून रेडिमेड कपड्यांना मागणी वाढली आहे. शिवाय हे कपडे तुलनेने स्‍वस्‍त पडतात. मुख्य शहरासह ग्रामीण भागांतही ठिकठिकाणी रेडिमेड कपड्यांची मोठमोठे शो-रूम सुरू झाली आहेत.
- जगदीश पाटील, विक्रेता