कुस्तीतील ‘सुवर्ण’वेधातून उमटवली आगळी छाप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कुस्तीतील ‘सुवर्ण’वेधातून उमटवली आगळी छाप
कुस्तीतील ‘सुवर्ण’वेधातून उमटवली आगळी छाप

कुस्तीतील ‘सुवर्ण’वेधातून उमटवली आगळी छाप

sakal_logo
By

प्रमोद जाधव, अलिबाग

धकाधकीचे जीवन, पोलिस दलात नोकरी, कुटुंबकबिला सांभाळत आवडीच्या क्षेत्रात स्‍वतःला सिद्ध करताना कुणाचीही दमछाक होणार, मात्र रायगडमधील पोलिस नाईक रेश्मा डफळ याला अपवाद ठरल्या आहेत. त्‍यांनी कुस्तीमध्ये राज्य, देश व आंतरराष्ट्रीय पातळीवर सुवर्ण कामगिरी करीत वेगळी छाप उमटवली आहे.

रेश्मा सुदाम डफळ या रायगड पोलिस दलात ६ फेब्रुवारी २०१२ रोजी शिपाई म्हणून भरती झाल्या. सुरुवातीला मुख्यालयात सेवा केल्‍यावर सध्या त्या रायगड पोलिस अधीक्षक कार्यालयातील नियंत्रण कक्षात पोलिस नाईक म्हणून कर्तव्य बजावत आहेत. मूळच्या पुण्यातील धामारी गावातील असलेल्‍या रेश्‍मा यांनी वयाच्या ११ वर्षांपासून कुस्ती खेळायला सुरुवात केली. गाव पातळीपासून तालुका, जिल्हास्तरावर कुस्‍तीतून स्‍वतःची ओळख निर्माण केली.
पोलिस दलातील जिल्हा, कोकण परिक्षेत्र, महाराष्ट्र क्रीडा अशा स्पर्धेत सहभाग होत सुवर्णपदके पटकावली आहेत. पोलिस दलातील नोकरी, कुटुंबकबिला सांभाळत त्‍या दररोज दोन ते तीन तास कुस्तीचा सराव करतात. त्‍यासाठी पतीचे वेळोवेळी सहकार्य मिळत असल्यानेच राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर चांगली कामगिरी बजावत आल्‍याचे त्‍या सांगतात.
कुस्तीतील बारकावे जाणून घेण्यासाठी त्‍या सोशल मीडियाचाही उपयोग करून घेत आहेत. महाराष्ट्र केसरी, हिंद केसरी पुरस्कार प्राप्त खेळाडूंचे सोशल मीडियावरील कुस्तीचे डाव बघून त्यातून शिकण्याचा त्‍या प्रयत्‍न करतात.

ज्‍युडो, बॉक्‍सिंगमध्येही नावलौकिक
सिंधुदुर्ग, पालघर येथे झालेल्या कोकण परिक्षेत्रीय पोलिस क्रीडा स्पर्धा, वरळी येथे झालेल्या नॅशनल ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविले आहेत. श्रीलंकेतील कोलंबोत झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेतही त्‍यांनी सुवर्णपदक मिळवले आहे. कुस्तीबरोबरच ज्युडो कराटे, बॉक्‍सिंग अशा खेळांतही त्‍यांनी उल्‍लेखनीय कामगिरी करीत पोलिस दलात नावलौकिक मिळवले.

बक्षिसांचा वर्षाव
रेश्मा डफळ यांनी कुस्तीतून आतापर्यंत ४० पेक्षा अधिक बक्षिसे मिळविली आहेत. त्यात २२ सुवर्णपदके आहेत. तसेच राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार, रायगड भूषण पुरस्कार, कुलाबा जीवनगौरव पुरस्कार, क्रीडा रत्न पुरस्कार, महाराष्ट्र खेळ पुरस्कार, भारतभूषण पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी रेश्मा डफळ यांना सन्मानित केले आहे.

पोलिस खात्यातून खऱ्या अर्थाने क्रीडा स्पर्धेत संधी मिळाली. वरिष्ठांकडून वेळोवेळी मार्गदर्शन मिळते. कुस्तीचा सराव कधी पहाटे तर कधी संध्याकाळी जसा वेळ मिळेल तसा करते; तर कधी सातारा, सांगली या ठिकाणी जाऊन प्रशिक्षण शिबिरात सराव केला जातो. सोशल मीडियावरूनही कुस्‍तीचे बारकावे शिकण्याचा प्रयत्‍न असतो. त्यामुळेच आज कुस्ती खेळात आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख निर्माण करता आली आहे.
- रेश्मा डफळ, पोलिस नाईक

Web Title: Todays Latest Marathi News Ali22b37223 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..