सरसगडाच्या पायऱ्यांवरून तरुण घसरला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सरसगडाच्या पायऱ्यांवरून तरुण घसरला
सरसगडाच्या पायऱ्यांवरून तरुण घसरला

सरसगडाच्या पायऱ्यांवरून तरुण घसरला

sakal_logo
By

पाली, ता. २२ (वार्ताहर) ः पालीतील सरसगडच्या पायऱ्यांवरून घसरून रविवारी दुपारी तीनच्या सुमारास एक तरुण खाली पडला. त्याचा डावा हात फॅक्चर झाला असून खांदा निखळला आहे व कमरेला मुका मार लागला आहे. स्थानिक तरुणांच्या अथक प्रयत्नांनी व रेस्क्यू टीमच्या मदतीने तरुणाला गडावरून खाली आणून पालीतील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. त्‍यानंतर पुढील उपचारासाठी मुंबईत नेण्यात आले.
मुकुल जोशी (रा. मुलुंड) असे तरुणाचे नाव असून चक्रम हायकर्स टीमचा सदस्य आहे. रविवारी टीममधील अनेक जण सरसगड किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी आले होते. पावसामुळे सरसगडाच्या पायऱ्या निसरड्या झाल्या आहेत. मुकुल हा वरच्या पायरीवरून घसरून थेट खाली कोसळला आणि जखमी झाला.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक तरुण अमित निंबाळकर, प्रदीप (दादू) गोळे, ज्ञानेश्वर जगताप, दर्शन तळेकर, रोहन राऊत, संकेत राऊत, सुमित राऊत, अभिजीत वरंडे व विवेक गुंड यांनी त्‍याला स्ट्रेचरवरून खाली आणले. वाटेत खोपोली येथील रेस्क्यू टीमने तरुणाला खाली आणण्यासाठी साह्य केले.

Web Title: Todays Latest Marathi News Ali22b37242 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..