पोलिस वसाहतीकडे जाणारा मार्ग खडतर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोलिस वसाहतीकडे जाणारा मार्ग खडतर
पोलिस वसाहतीकडे जाणारा मार्ग खडतर

पोलिस वसाहतीकडे जाणारा मार्ग खडतर

sakal_logo
By

प्रमोद जाधव : सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. २३ ः कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी रात्रीचा दिवस करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या वसाहतीचा मार्ग खडतर असल्याचे दिसून येत आहे. अपर पोलिस अधीक्षक यांचा बंगला ते पोलिस कर्मचारी वसाहतीदरम्‍यान मोठ मोठे खड्डे पडले असून चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला गवत, झाडेझुडपांनी विळखा घातला आहे. पथदिव्यांअभावी येथून रात्रीचा प्रवास करणेही कठीण होत आहे. संबंधित विभागाकडून रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याने कर्मचाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेचा व आरोग्याचा प्रश्न गंभीर होण्याची भीती व्यक्त होत आहे. आश्‍चर्य म्‍हणजे, हा रस्ता नक्की कोणाच्या ताब्यात आहे, याचे गूढ कायम आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग व नगरपालिकेने हा रस्ता त्यांच्या ताब्यात नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे रस्त्याला नक्की वाली कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
पोलिस कर्मचाऱ्यांना हक्काचे घर मिळावे, यासाठी गेल्या काही वर्षांपूर्वी पोलिस मुख्यालय परिसरात कोट्यवधी रुपये खर्च करून तीन इमारती बांधण्यात आल्या. या इमारतीमध्ये ३० हून अधिक कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय राहत आहेत. या इमारतीलगतच शहराच्या मुख्य रस्त्याला जोडणारा अंतर्गत रस्ता असून खड्‌ड्‌यांमुळे दुरवस्‍था झाली आहे.
पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी साचल्‍याने डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. पथदिवे नाहीत, त्‍यात रस्‍त्‍यालगत झाडेझुडपे वाढल्‍याने रात्रीच्या वेळी प्रवास करताना विषारी व हिंसक श्वापदांची भीती वाटते. कायदा व सुव्यवस्था राखण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याची खंत कर्मचाऱ्यांचे कुटुंबीयांकडून व्यक्‍त होत आहे.
गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. ऊन पावसाची तमा न बाळगता, कर्तव्य बजावणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या वसाहतीतील रस्त्याचे विघ्न दूर होईल का, असा प्रश्‍न उपस्‍थित होत आहे.

वसाहतीकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरुस्ती करण्याबरोबरच दुतर्फा पथदिवे लावण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र दिले आहे. कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेच्या दृष्टीने रस्त्याची दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभागाने प्राधान्याने करावी.
- अतुल झेंडे, अपर पोलिस अधीक्षक, रायगड

अपर पोलिस अधीक्षक यांचा बंगला ते पोलिस वसाहतीकडे जाणारा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित येत नाही. मात्र याबाबत माहिती घेऊन कळविण्यात येईल.
- व्ही. जी. तेलंग, उपअभियंता,
सार्वजनिक बांधकाम विभाग

अपर पोलिस अधीक्षक यांचा बंगला ते पोलिस वसाहत इमारतीपर्यंत रस्ता नगर परिषदेच्या अखत्यारित येत नाही.
- अंगाई साळुंखे, मुख्याधिकारी, अलिबाग नगरपरिषद

Web Title: Todays Latest Marathi News Ali22b37251 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..