रायगडमध्ये जलजीवनच्या एक हजार नव्या पाणीपुरवठा योजना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रायगडमध्ये जलजीवनच्या एक हजार नव्या पाणीपुरवठा योजना
रायगडमध्ये जलजीवनच्या एक हजार नव्या पाणीपुरवठा योजना

रायगडमध्ये जलजीवनच्या एक हजार नव्या पाणीपुरवठा योजना

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. २३ : कितीही पाऊस पडला तरी रायगड जिल्ह्यातील पाणीटंचाई कमी होत नाही. यावर मात करण्यासाठी रायगड जिल्ह्यातील १०७० नळ पाणीपुरवठा योजनांना मजुरी देण्यात आली आहे. जिल्ह्यातील दुर्गम भागातील वाड्यावस्त्यांना भीषण पाणीटंचाई जाणवत असते. या वर्षी ३७ टँकरद्वारे ५८ गावे आणि २४५ वाड्यांत पाणीपुरवठा करण्यात आला होता. या टंचाईवर मात करण्यासाठी जलजीवन मिशनअंतर्गत नव्या योजनांना मंजुरी दिली जात असल्याची माहिती पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी सभागृहात दिली.

केंद्र शासनाची हर घर नल ही योजना रायगड जिल्ह्यात मोठ्या स्वरूपात राबवली जात आहे. २०२४ पर्यंत प्रत्येक घरात नळाद्वारे पाणी मिळाले पाहिजे हे ध्येय या योजनेतून ठेवण्यात आले; मात्र रायगड जिल्ह्यात ही योजना राबवण्यात अनेक अडचणी येत आहेत. अनेक दुर्गम भागांत पाणीपुरवठा करण्याची सोयच नाही. दूरच्या पाणवठ्यावरून महिलांना उन्हाळ्यात पाणी आणावे लागते. यात वेळ आणि श्रम वाया जात असल्याने प्रत्येक घरात नळ जोडणी दिली जाणार आहे. सध्या जलजीवन मिशनअंतर्गत ६४२ योजना कार्यान्वित आहेत. याद्वारे होणारा पाणीपुरवठा कमी पडत आहे. यामुळे नव्या योजनांना मंजुरी देण्यात आली आहे. नियमित पाणीपुरवठा करण्यासाठी जलजीवन मिशनअंतर्गत १०७० नळ पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आल्या आहेत. त्यापैकी ४५९ योजनांचा कार्यारंभ आदेश देण्यात आला असून ३९७ योजना प्रगतिपथावर आहेत, अशी माहिती पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी आज विधानसभेत दिली.

***
पाणीटंचाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी जलजीवन मिशनअंतर्गत या योजना राबवल्या जात आहेत. रायगड जिल्ह्याच्या दुर्गम भागातील लोकवस्तीसाठी या योजना फायद्याच्या ठरणार आहेत. यामुळे पाणीटंचाई कमी होण्यात मदत होणार आहे.
- संजय वेंगुर्लेकर, कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग (राजिप)

Web Title: Todays Latest Marathi News Ali22b37277 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..