गणेशभक्तांसाठी महामार्गावर विशेष आरोग्य केंद्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गणेशभक्तांसाठी महामार्गावर विशेष आरोग्य केंद्र
गणेशभक्तांसाठी महामार्गावर विशेष आरोग्य केंद्र

गणेशभक्तांसाठी महामार्गावर विशेष आरोग्य केंद्र

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. २५ : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईहून कोकणात जाण्यासाठी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. १८ व क्र.४ वरून मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू होते. या वेळी अपघात होऊन जीवितहानी तसेच प्रवासी जखमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अपघातग्रस्तांना तातडीची वैद्यकीय सेवा मिळावी, यासाठी हमरापूर, वडखळ, वाकणफाटा, कोलाड नाका, इंदापूर, दासगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय पथक पुरेशा औषधसाठा व रुग्णवाहिकेसह सज्ज ठेवणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे यांनी दिली आहे.
गणेशोत्सवानिमित्त रविवार, २८ ऑगस्‍टपासूनच कोकणात जाणाऱ्या वाहनांची वर्दळ वाढण्याची शक्‍यता आहे. ३१ ऑगस्टपासून त्‍यात आणखी वाढ होणार असून अपघाताची शक्‍यता लक्षात घेऊन जिल्हा आरोग्य विभागाने याबाबत व्यवस्था केली आहे. यामध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांसह आरोग्य सहायक, आरोग्य सेविका आणि चालकासह एक अॅम्ब्युलन्स सज्ज ठेवण्यात येणार आहे.


हमरापूर, वडखळ, वाकणफाटा, कोलाड नाका, इंदापूर, दासगाव अशा ठिकाणी विशेष वैद्यकीय बुथ तयार करण्यात येत आहेत. त्याचबरोबर अतिगंभीर रुग्णांना तत्काळ उपचार मिळावेत, यासाठी प्रमुख रुग्णालयातही व्यवस्था केली जाणार आहे.
- डॉ. सुधाकर मोरे, आरोग्‍य अधिकारी, रायगड

Web Title: Todays Latest Marathi News Ali22b37294 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..