बचतगटातर्फे बाप्पासाठी माफक दरात कंठीहार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बचतगटातर्फे बाप्पासाठी माफक दरात कंठीहार
बचतगटातर्फे बाप्पासाठी माफक दरात कंठीहार

बचतगटातर्फे बाप्पासाठी माफक दरात कंठीहार

sakal_logo
By

बचत गटातर्फे बाप्पासाठी माफक दरात कंठीहार
सकाळ वृत्तसेवा
पाली, ता. ३० (वार्ताहर) ः सुधागड तालुक्यातील गोमाशी येथील सोमजाई माता महिला बचत गटातील महिलांनी बाप्पासाठी घरगुती सुशोभित कंठीहार बनवले आहेत. ते माफक दरात विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. लवकरच आपल्या लाडक्या गणरायाचे आगमन होणार आहे. यासाठी गणेशभक्त मोठ्या प्रमाणात बाजारातून आपल्या बाप्पासाठी बाशिंग, हिरे, सजावटीचे साहित्य मोठ्या प्रमाणात खरेदी करतात. यानिमित्त गोमाशी येथील सोमजाई माता महिला बचत गटातील महिलांनी एकत्रित येऊन सुशोभीत, आकर्षक असे घरगुती कंठीहार तयार केले आहेत. हे हार ग्राहकांना अतिशय माफक दरात विक्रीसाठी तयार केले आहेत. महिलांनी तयार केलेल्या कंठीहाराची किंमत बाजारातील किंमतीपेक्षा कमी आहेत. त्यामुळे अनेकजण ते खरेदी करत आहेत. हे कंठीहार ग्राहकांना ८० ते १०० रुपयांना उपलब्ध होतील.

फोटो ओळ, पाली, कंठीहार दाखवताना महिला. (छायाचित्र ः अमित गवळे)

Web Title: Todays Latest Marathi News Ali22b37333 Txt Raigad Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..