गणेशोत्सवात जागर अमृत महोत्‍सवाचा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गणेशोत्सवात जागर अमृत महोत्‍सवाचा
गणेशोत्सवात जागर अमृत महोत्‍सवाचा

गणेशोत्सवात जागर अमृत महोत्‍सवाचा

sakal_logo
By

अमित गवळे, पाली
तब्बल दोन वर्षांनी निर्बंधाविना धुमधडाक्यात घराघरांत गणेशोत्‍सव साजरा होत आहे. त्यातच हे वर्ष स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष म्हणून साजरे होत असल्‍याने अनेकांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा देखावा साकारला आहे.
पालीतील शिक्षक राजेंद्र अंबिके व त्यांच्या कुटुंबीयांनी आपल्या ५ दिवसाच्या गणरायासमोर ‘जागर गणरायाचा, उत्सव स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा’ हा देशभक्‍तिपर प्रबोधनात्मक व पर्यावरणस्नेही देखावा साकारला आहे. यात थोर क्रांतिकारक व हुतात्म्यांना मानवंदना दिली आहे. यामध्ये भगतसिंग, सुखदेव, राजगुरू फाशी प्रतिकात्मक दाखवली आहे. तर गांधीजींचे स्वदेशी व खादीचे प्रतीक चरखा ठेवला आहे. तसेच विविध क्रांतिकारक व स्वातंत्र्यसेनानी अगदी बालवीर शिरीषकुमार पासून ते महात्मा गांधींपर्यंत दाखवणारे ‘जरा याद करो कुर्बानी’ संदेशपर पोस्टर्स, तसेच सर्वधर्मसमभाव दाखवणारे प्रार्थनास्थळांच्या प्रतिकृती, याशिवाय स्वच्छ भारत, इस्रोचे यान, ऑलिंपिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा, तसेच देशभक्‍तिपर घोषणा, गीतांचे पार्श्वगायन असा स्वातंत्र्यपूर्व व त्यानंतरचा ७५ वर्षातील भारत साकारला आहे. तर काही ठिकाणी ‘घर घर तिरंगा’ अभियान सजावटीतून साकारले आहे. प्रसिद्ध कवी उमेश जाधव यांनी सुधागड तालुक्यातील कासारवाडी येथील आपल्या घरी स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव देखावा केला आहे.

घरगुती गणपती सजावटीतून सामाजिक संदेश दरवर्षी देत असतो. या वर्षी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देखाव्यातून साकारतांना आमच्या कुटुंबाला अभिमान वाटत आहे.
- राजेंद्र अंबिके, राज्य आदर्श शिक्षक,पाली

पाली ः गणरायासमोर स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव देखावा. (छायाचित्र ः अमित गवळे)

Web Title: Todays Latest Marathi News Ali22b37370 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..