जिल्‍ह्यात पोषण महिना अभियान सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्‍ह्यात पोषण महिना अभियान सुरू
जिल्‍ह्यात पोषण महिना अभियान सुरू

जिल्‍ह्यात पोषण महिना अभियान सुरू

sakal_logo
By

अलिबाग, ता. १ (बातमीदार) ः माता आणि बालके सुदृढ राहावीत, यासाठी रायगड जिल्हा परिषद महिला व बालविकास विभागामार्फत पोषण महिना अभियान सुरू केले आहे. या अभियान १ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर या कालावधीत होणार असून माता व बालकांच्या आरोग्याच्या दृष्टीने वेगवेगळे उपक्रम घेण्यात येणार असल्याची माहिती महिला व बालविकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन मंडलिक यांनी दिली आहे.

पोषण महिना अभियानांतर्गत बालकांना मध्यान्ह भोजन कालावधीत हात स्वच्छ धुण्याचे महत्त्व पटवून दिले जाणार आहे. गावांमध्ये प्रभातफेरी काढून आरोग्य व पोषणविषयक संदेशाचा प्रचार व प्रसार केला जाणार आहे. ॲनेमियामुक्त भारत कार्यक्रमाअंतर्गत नियुक्त केलेल्या शाळांच्या नोडल अधिकाऱ्यांच्या मदतीने पोषण महिन्यात नियमितरीत्या शाळेतील मुलांना मध्यान्ह भोजनादरम्यान लोहयुक्त गोळ्यांचे वाटप केले जाणार आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळांमध्ये एक टी-३ कॅम्पचे आयोजन करून विद्यार्थ्यांची हिमोग्लोबिनची तपासणी करण्यात येणार आहे. तसेच प्रशिक्षणार्थी परिचारिका, आशा स्वयंसेविका यांच्यामार्फत गृहभेटी देऊन जनजागृती करण्यात येणार आहे.
अंगणवाडी स्तरावर एक समुदाय आधारित कार्यक्रम, ग्राम आरोग्य स्वच्छता पोषण दिवस व बालक संगोपन आधारित पालक मेळावा घेण्यात येणार आहे. कुपोषित बालकांच्या व्यवस्थापनेसाठी अंगणवाडी स्तरावर ग्राम बाल विकास केंद्राचे आयोजन केले जाणार आहे. बचत गटाच्या महिला प्रतिनिधींचा प्रभावीपणे सहभाग यामध्ये घेण्यात येणार आहे.


पोषण महिना अभियान महत्त्वाकांक्षी अभियान असून माता व बालकांना सशक्त बनविण्यासाठी त्याचे नियोजन करण्यात आले आहे. महिनाभर चालणारे हे अभियान जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी केंद्रात राबविण्यात येणार आहे. मातेला पोषक आहार व चांगली आरोग्यसेवा मिळण्यासाठी व त्यांचे योग्यपणे पोषण होण्यासोबतच कुपोषण दूर होण्यासाठीच्या विविध उपाय व उपक्रमांचा त्यात समावेश आहे.
- डॉ. किरण पाटील
मुख्य कार्यकारी अधिकारी, रायगड जिल्हा परिषद

Web Title: Todays Latest Marathi News Ali22b37373 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..