विराट कोहली झाला अलिबागकर; ऐवढ्या कोटीत घेतली जागा | Virat Kohli Alibaug House | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Virat Kohli झाला अलिबागकर; ऐवढ्या कोटीत घेतली जागा
विराट कोहली झाला अलिबागकर

Virat Kohli झाला अलिबागकर; ऐवढ्या कोटीत घेतली जागा

sakal_logo
By

Virat Kohli Alibaug House

सकाळ वृत्तसेवा
अलिबाग : भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहलीने गणपतीच्या मुहूर्तावर अलिबागमध्ये जमीन खरेदी केली. झिराड परिसरात हवेशीर आठ एकर जागा असून येथे तो फार्म हाऊस बांधणार असल्याचे समजते. सध्या विराट कोहली आशिया कप क्रिकेट स्पर्धेसाठी दुबईत असून त्याच्या वतीने त्याचा लहान भाऊ विकास कोहली याने हा व्यवहार गणपतीच्या आदल्या दिवशी मंगळवारी पूर्ण केला.

सहा महिन्यांपूर्वी विराट आणि पत्नी अनुष्का यांनी झिराड येथे येऊन जागेची पाहणी केली होती. क्रिकेटच्या व्यग्र कार्यक्रमामुळे विराट यास अलिबागमध्ये येऊन जागेचा व्यवहार पूर्ण करता येत नव्हता. अखेर गणपतीच्या आदल्या दिवसाचा मुहूर्त साधत लहान भाऊ विकासने पॉवर ऑफ अॅटर्नीद्वारे व्यवहार पूर्ण केला. खरेदी-विक्रीचे कागदपत्रे अलिबाग येथील सह दुय्यम निबंधक अश्विनी भगत यांच्याकडे रजिस्टर केले.

१९ कोटींचा व्यवहार
या जमिनीची एकूण किंमत १९ कोटी २४ लाख ५० हजार रुपये असून यासाठी त्याने ३ लाख ३५ हजार रेडिरेकनरनुसार १ कोटी १५ लाख ४५ हजार रुपयांची स्टॅम्प ड्युटी सरकारच्या तिजोरीत जमा केली. विकास कोहलीने निबंधक कार्यालयात उपस्थित राहून हा व्यवहार रजिस्टर केला.

क्रिकेटपटूंना भुरळ
या व्यवहारानंतर रवी शास्त्री, रोहित शर्मा यांच्यापाठोपाठ आता विराट कोहलीही अलिबागकर होणार आहे. रवी शास्त्री याने दहा वर्षांपूर्वीच अलिबागमध्ये घर बांधले आहे, तर रोहित शर्मा याचे म्हात्रोळी-सारळ परिसरात ३ एकरमधील फार्म हाऊसचे काम चालू आहे. या व्यतिरिक्त हार्दिक पंड्या, यजुवेंद्र चहल हेदेखील काही दिवसांपासून जागेचा शोध घेत अलिबागमध्ये पोहचले होते.

Web Title: Todays Latest Marathi News Ali22b37374 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :CricketVirat kohlialibag