जिल्ह्यातील ३२ शिक्षकांना मिळणार आदर्श पुरस्‍कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्ह्यातील ३२ शिक्षकांना मिळणार आदर्श पुरस्‍कार
जिल्ह्यातील ३२ शिक्षकांना मिळणार आदर्श पुरस्‍कार

जिल्ह्यातील ३२ शिक्षकांना मिळणार आदर्श पुरस्‍कार

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

अलिबाग, ता. ४ : शिक्षक दिनाचे औचित्य साधून रायगड जिल्हा परिषदेकडून देण्यात येणाऱ्या आदर्श शिक्षक पुरस्कारांची यादी सोमवारी (ता.५) जाहीर होणार आहे. एकूण ३२ पुरस्कार्थीची यादी शिक्षण विभागाने तयार केली आहे. प्रत्येक तालुक्यामधील प्राथमिक आणि माध्यमिक विभाग असे दोन पुरस्कार्थींची निवड करण्यात येणार असून सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षकांसाठी दोन महिला शिक्षकांचीही विशेष निवड करण्यात येणार आहे.
सध्या जिल्हा परिषदेवर प्रशासक असल्याने कोणत्याही राजकीय हस्तक्षेपाशिवाय पुरस्कार्थींची निवड करण्याचे शिक्षण विभागाचे प्रयत्न आहेत. सोमवारी यादी प्रसिद्ध झाल्यानंतर पुरस्कार वितरणाची तारीख जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेकडून देण्यात आली आहे.
२०१६ पासून आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी शासनाने निकष ठरवले आहेत. या निकषात बसत नसल्याने पुरस्कारासाठी दोन वर्षांपासून प्रस्तावांची संख्या कमी झाली आहे. प्राथमिक आणि माध्यमिकच्या प्रत्येक तालुक्यातून पुरस्कार देण्यात येतो. कोरोनामुळे गेल्‍या वर्षीपासून ऑनलाईन प्रस्ताव मागवण्यात येत आहेत. या वर्षी ३२ पुरस्कारांसाठी ५० हून जास्त प्रस्ताव प्राप्त झाले होते. त्यातही माध्यमिकचे प्रस्ताव कमी होते. प्रामाणिकपणे काम करणाऱ्या शिक्षकांवर अन्याय होऊ नये म्हणून आलेल्या प्रस्तावातील सर्व शिक्षकांच्या कागदपत्रांची छाननी केल्यानंतर मुलाखतीसाठी बोलावण्यात आले होते. विभागीय आयुक्तांच्या मंजुरीनंतर पुरस्कार जाहीर करण्यात येणार आहेत.

शिक्षक दिनाचे औचित्य साधून ५ सप्टेंबर रोजी पुरस्कार जाहीर करण्यात येणार आहेत. पुरस्कार वितरणाची तारीख सोयीनुसार नंतर जाहीर केली जाईल. चांगले काम करणाऱ्या शिक्षकांवर अन्याय होऊ नये म्हणून आलेल्या प्रस्तावांची छाननी करूनच यादी मंजुरीसाठी पाठवण्यात आली आहे.
- डॉ. किरण पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, रायगड जिल्‍हा परिषद


प्रस्ताव पाठवलेल्या शिक्षकांच्या मुलाखती घेतल्‍या आहेत. यातून ज्या शिक्षकांनी खरोखरच चांगले काम केले आहे, अशा शिक्षकांना पुरस्कार मिळावा, असा प्रयत्न आहे.
- राजेश सुर्वे, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद

Web Title: Todays Latest Marathi News Ali22b37380 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..