हाफ मॅरेथॉनमध्ये विशाल, विश्‍वानीची बाजी हाफ मॅरेथॉनमध्ये विशाल, विश्‍वानीची बाजी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हाफ मॅरेथॉनमध्ये विशाल, विश्‍वानीची बाजी
हाफ मॅरेथॉनमध्ये विशाल, विश्‍वानीची बाजी
हाफ मॅरेथॉनमध्ये विशाल, विश्‍वानीची बाजी हाफ मॅरेथॉनमध्ये विशाल, विश्‍वानीची बाजी

हाफ मॅरेथॉनमध्ये विशाल, विश्‍वानीची बाजी हाफ मॅरेथॉनमध्ये विशाल, विश्‍वानीची बाजी

sakal_logo
By

पाली, ता. ४ (वार्ताहर) ः सुधागड तालुक्यातील घपकी येथे नुकत्याच राज्यस्तरीय सुधागड हाफ मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचा शुभारंभ आंतरराष्ट्रीय खेळाडू ललिता बाबर व पाली तहसीलदार दिलीप रायन्नावर यांच्या हस्‍ते करण्यात आला. मॅरेथॉनमध्ये राज्यातून तब्बल ३०० ते ३५० स्पर्धकांनी सहभाग घेतला. त्यामध्ये २१ किलोमीटर मॅरेथॉन स्पर्धेत पुरुष गटात विशाल कंबारिया यांनी प्रथम क्रमांक पटकावला, तर द्वितीय क्रमांक सुधागड तालुक्यातील रामू पारधी आणि तृतीय क्रमांक प्रवीण निकम यांनी मिळविला.
महिला गटात २१ किलोमीटर स्पर्धेत विश्र्वानी मोरे प्रथम, द्वितीय क्रमांक वृषाली पवार व तृतीय क्रमांक सिंधू उमेश हिने पटकावला. १० किलोमीटर मॅरेथॉन स्पर्धेत पुरुष गटात दीपक सिंग प्रथम, द्वितीय क्रमांक अमर धुमणे, तृतीय क्रमांक अजय सूर्यवंशी यांनी पटकवला. तसेच महिला गटात सानिका नलावडे हिने प्रथम, तर द्वितीय क्रमांक सुजाता मुंडेकर व तृतीय क्रमांक वेदिका मंडलिक हिने पटकावला आहे. स्पर्धेत मुंबई येथील राजा अन्नपुरम मुदलियार हे दिव्यांग सरकारी अधिकारीही उत्साहाने सहभागी झाले होते.
स्पर्धेतून मिळालेली रक्कम तालुक्याच्या विकासासाठी वापरण्यात येणार असल्‍याचे शिवऋण प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष केतन म्हसके यांनी सांगितले. स्पर्धेला रायगड जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, पाली पोलिस निरीक्षक विश्वजीत काईंगडे, गटविकास अधिकारी विजय यादव, शिवऋण प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमोल मोरे, अजय मुळे आदींसह ग्रामस्थांचे विशेष सहकार्य लाभले.

Web Title: Todays Latest Marathi News Ali22b37397 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..