सामाजिक एकजुटीचा संदेश देण्याचा प्रयत्‍न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सामाजिक एकजुटीचा संदेश देण्याचा प्रयत्‍न
सामाजिक एकजुटीचा संदेश देण्याचा प्रयत्‍न

सामाजिक एकजुटीचा संदेश देण्याचा प्रयत्‍न

sakal_logo
By

प्रमोद जाधव : सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. ४ ः अलिबाग शहरातील जुन्या बाजारपेठेत सन्मित्र गणेशोत्सव मंडळाकडून ६० वर्षांपासून बाप्पाची प्रतिष्ठापना केली जाते. हिंदू- मुस्लिम व अन्य समाज एकत्र येऊन हा उत्सव साजरा करतात. एकतेचे प्रतीक म्हणून सन्मित्र गणेशोत्सव मंडळाकडे पाहिले जात असून मंडळाने यातून एक वेगळी ओळख निर्माण करून समाजातील प्रत्येक घटकाला एकजुटीचा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.
अलिबागमधील जुने भाजी मार्केट या ठिकाणी गणेशोत्सव साजरा व्हावा, यासाठी त्या वेळी हिंदू - मुस्लिम समाजातील काही मंडळ एकत्र आली. सन्मित्र गणेशोत्सव मंडळाची स्थापना करून हा उत्सव साजरा करण्याचा निर्णय १९६२ मध्ये घेण्यात आला. त्या वेळी मुस्लिम समाजातील प्रतिष्‍ठित व्यक्तिमत्त्व म्हणून ओळख असणारे पापाभाई पठाण हे सन्मित्र गणेशोत्सव मंडळाचे पहिले अध्यक्ष होते. अलिबाग तालुक्यातील सर्वात जुने मंडळ म्हणून सन्मित्र गणेशोत्सव मंडळ ओळखले जात असून हे सर्वधर्मीयांचे मंडळ असल्याचे मानले जाते.
गणेशोत्‍सवापूर्वी मंडप, आरास सजावटीचे कामही एकत्रित केले जाते. प्रत्येक समाजातील घटकाचा हातभार या उत्सवाला कोणत्या ना कोणत्या मार्गाने लागतो. गणेशोत्वाच्या दहा दिवसांत परिसरातील सर्वधर्मीय भाविक आळीपाळीने कामकाजात सहकार्य करीत असल्याचे विद्यमान अध्यक्ष अश्‍विन लालन यांनी सांगितले. जिल्ह्यातील अनेक भाविक या मंडळाच्या गणेशतूर्तीला आर्वजून दर्शन घेतात. ६० वर्षांची परंपरा असलेल्या अलिबाग येथील ‘सन्मित्र’ गणेशोत्सव मंडळ जातीपातीच्या पलीकडे जात गणेशोत्सव साजरा करीत आहेत.

पर्यावरण संतुलनासाठी फायबरची मूर्ती
मंडळाने पर्यावरणाचा समतोल राखण्यावर भर देत गेल्या दहा वर्षांपासून फायबरच्या मोठ्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते; परंतु लहान मूर्तीचे विसर्जन करून एक वेगळा संदेश जनतेपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न केला आहे. सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी वेगवेगळे सामाजिक उपक्रम उत्‍सव काळात राबवले जात असल्‍याचे अश्‍विन लालन यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Ali22b37400 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..