जिल्‍ह्यातील १६ प्राथमिक शिक्षकांची निवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्‍ह्यातील १६ प्राथमिक शिक्षकांची निवड
जिल्‍ह्यातील १६ प्राथमिक शिक्षकांची निवड

जिल्‍ह्यातील १६ प्राथमिक शिक्षकांची निवड

sakal_logo
By

अलिबाग, ता. ४ (बातमीदार) ः रायगड जिल्ह्यात शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी परिश्रम घेणाऱ्या शिक्षकांना दरवर्षी शिक्षक दिनानिमित्त रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागामार्फत जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार दिला जातो. या पुरस्कारांची यादी जाहीर करण्यात आली असून १६ प्राथमिक शिक्षकांची निवड केली असून त्यात एका शिक्षकाला विशेष पुरस्कार जाहीर केला आहे. मात्र हा कार्यक्रम ५ सप्टेंबरला होणार नसल्याची माहिती जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे.
जिल्ह्यातील ग्रामीण भागातील तळागाळातील, खेड्यापाड्यात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांना घडविण्याचे काम जिल्ह्यातील शिक्षकांकडून केले जाते. परंतु शिक्षण देण्याबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी पुढाकार घेणाऱ्या शिक्षकांना पाच सप्टेंबर रोजी शिक्षक दिनानिमित्त जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार दिला जातो. परंतु या पुरस्कार वितरण सोहळा पाच सप्टेंबर रोजी होणार नसल्याची माहिती जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण अधिकारी पुनीता गुरव यांनी दिली आहे. मात्र जिल्ह्यातील १६ शिक्षकांची या आदर्श शिक्षक पुरस्कारसाठी निवड केल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

पुरस्‍कार प्राप्त शिक्षक
अलिबाग रवींद्र थळे, पेणमधील जयश्री म्हात्रे, पनवेलमधील विद्या पाटील, कर्जतमधील दिलीप घुले, खालापूरमधील महेश म्हात्रे, उऱणमधील संजय होळकर, सुधागडमधील सतिश खानेकर, रोहामधील विलास सुटे, महाडमधील अंजील चांदोरकर, श्रीवर्धनमधील क्रांती भोसले, म्हसळामधील किशोर मोहिते, पोलादपूरमधील सचिन दरेकर, माणगावमधील सुनील गोरेगावकर, तळामधील प्रतिभा पाटील, मुरुडमधील राजेंद्र साळावकर तसेच विशेष शिक्षक पुरस्कार म्हणून रोहामधील दीपक पाबेरकर यांना जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्कारामध्ये पाच महिला शिक्षिका व ११ पुरुष शिक्षकांचा समावेश आहे. त्यात पाच विषय शिक्षक, सहा उपशिक्षक, तर पाच पदवीधर शिक्षकांना पुरस्कार दिला जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Ali22b37403 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..