भक्तांना परतीचा प्रवास तापदायक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भक्तांना परतीचा प्रवास तापदायक
भक्तांना परतीचा प्रवास तापदायक

भक्तांना परतीचा प्रवास तापदायक

sakal_logo
By

भक्तांना परतीचा प्रवास तापदायक
पेण-अलिबागमध्ये सीएनजी, पेट्रोल पंप, एटीएम बंद

सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. ६ : सीएनजी पंप बंद, पेट्रोलचा तुटवडा, तसेच अनेक बॅंकांच्या एटीएममध्ये पैसे नसल्याने परतीच्या प्रवासाला लागलेल्‍या चाकरमान्यांची मोठी गैरसोय झाली.
खड्डेमय, अरुंद रस्‍त्‍यामुळे जेएसडब्‍ल्‍यू ते वडखळ बायपास रस्‍ता तसेच शहाबाज ते पेझारी दरम्‍यान मोठी वाहतूक कोंडी झाली होती. शिवाय मार्गावर वाहतूक नियंत्रणासाठी पोलिसही तैनात नसल्‍याने प्रवाशांचा संताप झाला.
खासगी वाहनाने आलेल्‍या चाकरमान्यांना पेट्रोल, सीएनजीसाठी धावाधाव करावी लागली. तर काही ठिकाणी सीएनजीसाठी तीन-तीन तास रांगेत थांबावे लागले. लांबच्या प्रवासाला निघालेल्या प्रवाशांना सीएनजी गॅस न मिळाल्याने प्रवास रद्द करावे लागल्याचे प्रकारही घडत आहेत. मोठ्या उत्‍साहाने गौरी - गणपतीसाठी गावाकडे आलेल्यांचा परतीचा प्रवास मात्र चांगलाच त्रासदायक होत आहे.


सर्वसामान्य जनतेला महागाईमुळे आधीच त्रस्‍त आहे. दोन वर्षांनंतर गणेशोत्‍सव जल्‍लोषात साजरा होत आहे. काही मंडपांचे भाडे डेकोरेटरला पूर्ण मिळतील का नाही, याची चिंता वाटते
- प्रफुल्ल म्हात्रे, कामगार नेते
हिन्द मजदूर किसान पंचायत महाराष्ट्र.

Web Title: Todays Latest Marathi News Ali22b37443 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..