समाज प्रबोधनाबरोबरच स्‍थानिक कलाकारांसाठी व्यासपीठ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

समाज प्रबोधनाबरोबरच स्‍थानिक कलाकारांसाठी व्यासपीठ
समाज प्रबोधनाबरोबरच स्‍थानिक कलाकारांसाठी व्यासपीठ

समाज प्रबोधनाबरोबरच स्‍थानिक कलाकारांसाठी व्यासपीठ

sakal_logo
By

प्रमोद जाधव ः सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. ६ ः अलिबागमधील सार्वजनिक बांधकाम गणेशोत्सव मंडळाने ५१ वर्षाची परंपरा जपत धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक उपक्रम राबवून समाज प्रबोधनाचा प्रयत्न केला आहे. यात स्थानिक कलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्याचा प्रयत्न मंडळाकडून नेहमीच केला जातो.
तळ कोकणात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. अनेक जण सुटी घेऊन गावी जातात. परंतु सरकारी सेवेत असल्याने जास्त दिवस सुटी काढून गणेशोत्सवात घरी जाता येत नसल्याने अलिबाग येथील सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यरत रत्नागिरी येथील कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन विभागाच्या कार्यालयासमोर गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्याचा निर्णय १९७१ मध्ये घेतला. मंडळाकडून आरोग्यविषयक शिबिर घेण्यात येत असून जनजागृतीपर उपक्रम राबवले जातात.
मंडळाला यंदा ५१ वर्षे पूर्ण होत असल्‍याने धार्मिक कार्यक्रमांसह गायनाचा कार्यक्रम, ऊर्मिला भुतकर यांचे सामाजिक विषयावर व्याख्यान आयोजन केले आहे. तसेच विनोदी लोकनाट्याचेही सादरीकरण होणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Ali22b37446 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..