वरसोलीमध्ये शेकापला शिवसेनेकडून खिंडार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वरसोलीमध्ये शेकापला शिवसेनेकडून खिंडार
वरसोलीमध्ये शेकापला शिवसेनेकडून खिंडार

वरसोलीमध्ये शेकापला शिवसेनेकडून खिंडार

sakal_logo
By

अलिबाग, ता. ६ : शेकापचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या वरसोली ग्रामपंचायतीच्या सदस्या नम्रता वर्तक यांच्यासह समर्थकांनी राजमळा येथे मंगळवारी (ता. ६) शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केला आहे. ही भविष्यातील मोठ्या पक्षांतराची नांदी असल्याचे समजले जात आहे. यामुळे शेकापला अलिबागमध्ये मोठे खिंडार पडणार असल्याचे राजकीय अभ्यासकांचे म्हणणे आहे.
अलिबाग-मुरूडचे आमदार महेंद्र दळवी, जिल्हा परिषद सदस्या मानसी दळवी, जिल्हाप्रमुख राजा केणी यांच्या कार्यपद्धतीवर प्रभावित झालो आहोत. त्यामुळेच आमदार महेंद्र दळवी व जिल्हा परिषद सदस्य मानसी दळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश करत असल्याची माहिती नम्रता वर्तक यांनी दिली. वरसोली ग्रामपंचायतीमध्ये शेकापचे प्राबल्य सतत राहिले आहे. या वर्चस्वाला शह देत महेंद्र दळवी यांनी वरसोलीमध्ये चांगलाच दबदबा निर्माण केला आहे. त्यांनी अनेक योजना यशस्वीपणे राबवल्याने वरसोलीमधील जनाधार दिवसेंदिवस वाढत आहे. ही सर्व परिस्थिती शेकापला घातक असल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Ali22b37447 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..