पालीमध्‍ये भटक्‍या कुत्र्यांचा धुमाकूळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पालीमध्‍ये भटक्‍या कुत्र्यांचा धुमाकूळ
पालीमध्‍ये भटक्‍या कुत्र्यांचा धुमाकूळ

पालीमध्‍ये भटक्‍या कुत्र्यांचा धुमाकूळ

sakal_logo
By

पाली, ता. ८ (वार्ताहर)ः प्रसिद्ध अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली शहरात पिसाळलेल्या, भटक्या कुत्र्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे पालीतील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून त्‍यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
हटाळेश्वर चौक, बल्लाळेश्वर मंदिर परिसर, शाळा, बाजारपेठ, बसस्थानक, बँक ऑफ इंडियाजवळ, तसेच सर्व आळ्यांमध्ये, तसेच कचरा कुंड्यांजवळ भटके, जखमी व मोकाट कुत्रे झुंडीने फिरतात. रात्रीच्या एखादा पादचारी किंवा दुचाकी वाहन दिसले की त्यांच्यावर धावून जातात. त्यामुळे वेग वाढविण्याच्या नादात दुचाकीचे अपघात होतात.
कुत्र्यांच्या सततच्या भुंकण्याचा त्रास नागरिकांना होतो. अनेक कुत्री जखमी अवस्थेत फिरत असल्‍याने दुर्गंधी पसरते, शिवाय रोगराई पसरण्याचा धोकादेखील आहे. पिसाळलेल्या कुत्र्यांच्या दहशतीमुळे लहान व शाळकरी मुले, वृद्ध आणि महिला यांना रस्त्यावरून चालणे धोक्याचे झाले आहे. याचे गांभीर्य लक्षात घेऊन भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी वारंवार केली जात आहे, मात्र याकडे नगरपंचायत प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्‍याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

पालीमध्ये मोकाट व भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. लहान मुले, वृद्ध व महिलांना या कुत्र्यांची सर्वांत जास्त भीती आहे. नगरपंचायत प्रशासनाने याप्रकरणी त्‍वरित दखल घेऊन लवकर उपाययोजना करावी.
- प्रकाश पालकर, सामाजिक कार्यकर्ते, पाली

पाली नगरपंचायतीकडून मोकाट कुत्रे व गुरे यांच्या बंदोबस्‍तासाठी लवकरच उपाययोजना हाती घेण्यात येणार आहे.
- विद्या येरूणकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, पाली नगरपंचायत

Web Title: Todays Latest Marathi News Ali22b37467 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..