अपघात, वाहतूक कोंडीवर तोडगा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अपघात, वाहतूक कोंडीवर तोडगा
अपघात, वाहतूक कोंडीवर तोडगा

अपघात, वाहतूक कोंडीवर तोडगा

sakal_logo
By

अलिबाग, ता. ११ (बातमीदार) ः रायगड जिल्ह्यातील राष्ट्रीय, राज्य महामार्गासह अनेक रस्त्यांवर होणारी वाहतूक कोंडी व अपघात रोखण्यासाठी जिल्हा वाहतूक शाखा कामाला लागली आहे. शाळेतील विद्यार्थ्यांसह चालक, प्रवाशांपर्यंत जनजागृती करण्यासोबतच अपघात क्षेत्रासह वाहतूक कोंडी होणाऱ्या जागांची पाहणी करून गतिरोधक, रेडीअम पट्टे लावून चालकांना जागृत करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
रायगड पर्यटनासह औद्योगिक जिल्हा म्हणून नावारूपाला आला आहे. वेगवेगळे उद्योग-धंदे जिल्ह्यात उभारू लागले आहेत. एकीकडे पर्यटनासोबत जिल्ह्यातील औद्योगिकीकरणामुळे नागरीकरण झपाट्याने होत आहे; तर दुसरीकडे वाढत्या रहदारीमुळे वाहतूक कोंडी, अपघातांच्या घटनांमध्येही वाढ होत आहे. यात वाहतुकीच्या नियंमाचे उल्लंघन करण्याच्या मानसिकतेमुळे मृत्यूचे प्रमाणदेखील अधिक आहे. त्यामुळे मुंबई-पुणे, मुंबई-गोवा या महामार्गांसह जिल्ह्याला जोडणाऱ्या रस्त्यांवर होणारे अपघात रोखण्यासाठी रायगड पोलिस दलाच्या जिल्हा वाहतूक शाखेच्या पोलिस निरीक्षक सुवर्णा पत्की यांनी पुढाकार घेतला आहे. याच अनुषंगाने जिल्ह्यातील अपघातप्रवण क्षेत्रांसह वाहतूक कोंडी होणाऱ्या क्षेत्रांची पाहणी रविवार (ता.११) पासून सुरू करण्यात आली असून अपघात रोखण्यासाठी गतिरोधक बसविण्याबरोबरच ठिकठिकाणी फलक लावून जनजागृती करण्यात येणार आहे.
---------------------------------------
विशेष पथकाची नेमणूक
द्रुतगती मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग व राज्य व इतर मार्गांवर दीडशेपेक्षा अपघात झाले. या अपघातांमध्ये १०० पेक्षा मयत झाले असून तीनशेपेक्षा अधिक जखमी झाले आहेत. त्यामुळे होणारे अपघात रोखण्यासाठी जिल्हा वाहतूक विभागाने एका पथकाची नेमणूक केली आहे. हे पथक पोलिस निरीक्षक यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत राहणार असून ९९ पोलिस कर्मचाऱ्यांसह तीन पोलिस उपनिरीक्षकांचा देखील समावेश आहे.
----------------------------
येथे अपघातांचा सर्वाधिक धोका
जिल्ह्यातील मुंबई-पुणे जुना मार्गावरील अंडा पॉईंट, ढेकू, आडोशी, मुंबई-पुणे जुना मार्गावरील कलोते, लोधीवली, माडप बोगदा ते लोधीवली, पानशील, रिसवाडी तसेच मुंबई-गोवा मार्गावरील डोलवी, गडब, कासू, आमटेम, पेण फाटा ते अंगार आळी, सुकेळी खिंड, पुई, मुगवली, कशेणे, ढालघर, लोणेरे, टेमपाले ते लाखपाले ते पहेल, गंधारपाले, वीर, चोळई, धामणदेवी, लोहारे तसेच राज्य मार्गावरील कर्जत चारफाटा, दासगाव व वडखळ-अलिबाग मार्गावरील तीनविरा हे अपघातप्रवण क्षेत्र आहे.
------------
अपघात रोखण्यासाठी सिग्नल बसविणार
रायगड जिल्ह्यातील अलिबाग, माणगाव, खालापूर, कर्जत या तालुक्यांच्या ठिकाणी वर्दळ वाढली आहे. मुंबई-पुणे जिल्ह्यापासून हे तालुके जवळ असल्याने या तालुक्यांतील महामार्गावरून वाहनांची रहदारी मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे अलिबाग, कर्जत, माणगाव, खालापूर याठिकाणी सिग्नल बसविण्यात येणार आहेत. त्याची पाहणी सुरू केली आहे. त्यामुळे लवकरच चार तालुक्यांमधील वर्दळीच्या ठिकाणांवर सिग्नल बसविण्यात येणार आहेत.
-----------------
रस्ता सुरक्षेसाठी जनजागृतीवर भर
शाळा, महाविद्यालयांत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षेचे महत्त्व पटवून देण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. शाळा सुटल्यावर रस्त्यावर होणारी वाहनांची गर्दी, पार्किंगचा प्रश्न अशा अनेक विषयांवर शाळा, वाहनचालकांची भेटी घेऊन वाहतूक कोंडी होणार नाही, याकडे लक्ष दिले जाणार आहे. तसेच शाळेतील मुलांना रस्ता सुरक्षेचे नियमांची माहिती मिळावी, म्हणून जनजागृती केली जाणार आहे.
----------------------------

Web Title: Todays Latest Marathi News Ali22b37484 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..