पालीत पोलिसांनी धरला ठेका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पालीत पोलिसांनी धरला ठेका
पालीत पोलिसांनी धरला ठेका

पालीत पोलिसांनी धरला ठेका

sakal_logo
By

पाली, ता. ११ (वार्ताहर) : सालाबादप्रमाणे यावर्षीही पाली पोलिस ठाण्यात गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. गणेशोत्सवात कायदा, शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पाली पोलिसांनी चोख कर्तव्य बजावले. त्यानंतर शनिवारी (ता. १०) पाली पोलिस ठाण्यातील बाप्पाचे वाजत गाजत विसर्जन करण्यात आले. या वेळी पोलिसांनीही ठेका धरला होता. रात्री उशिरापर्यंत ही विसर्जन मिरवणूक चालली. ही मिरवणूक पोलिस निरीक्षक विश्वजीत काईंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली निघाली. या वेळी सहायक पोलिस निरीक्षक अजित साबळे आदींसह पोलिस कर्मचारी व सामान्य नागरिक सहभागी झाले होते.

Web Title: Todays Latest Marathi News Ali22b37493 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..