घर, पाणीपट्टीची डिजिटल वसुली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

घर, पाणीपट्टीची डिजिटल वसुली
घर, पाणीपट्टीची डिजिटल वसुली

घर, पाणीपट्टीची डिजिटल वसुली

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. १३ : घरपट्टी, पाणीपट्टी वसुलीत सुलभता यावी, यासाठी रायगड जिल्हा परिषदेने डिजिटल करप्रणाली कार्यान्वित केली आहे. यामुळे ग्रामपंचायतींना घरपट्टी तसेच पाणीपट्टीवसुली जलद गतीने होणार आहे.
ग्रामीण भागातील अनेकजण नोकरी-धंद्याच्या निमित्ताने शहरामध्ये राहतात. गावाकडे गौरी-गणपती, होळीच्या सणासाठी आल्यावर ते थकीत कराचा भरणा ग्रामपंचायतीकडे करीत असतात. यामध्ये वेळ लागतो, अनेक वेळा ग्रामपंचायतींना करदात्यांकडे तगादा लावावा लागतो; तरीही घरपट्टी, पाणीपट्टीचा भरणा वेळेत न झाल्याने ग्रामपंचायतीला आर्थिक चणचण भासते. यामुळे जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या माध्यमातून ग्रामीण भागात घरपट्टी तसेच पाणीपट्टी करवसुलीसाठी आता डिजिटल करप्रणाली कार्यान्वित केली जाणार आहे. या प्रणालीमुळे कर वसुलीत सुसूत्रता येणार असून करदात्यांना ऑनलाइन पद्धतीने घरपट्टी तसेच पाणीपट्टीचा भरणा करणे, सोप्पे होणार आहे. तसेच या प्रणालीमुळे ग्रामपंचायतींना एका क्लिकवर संपूर्ण करदात्यांची संपूर्ण माहिती उपलब्ध झाल्याने उत्पन्नवाढीस मदत होणार आहे,
***
डिजिटल करप्रणाली तयार केल्यानंतर या प्रणालीचा चाचणी करण्यात आली. यामध्ये आढळलेल्या उणिवा दूर करून, ही प्रणाली जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींना देण्यात आली आहे. प्रणालीत ग्रामपंचायतनिहाय करदात्यांची माहिती, त्यांचा वार्षिक कर, थकीत कर याची माहिती असणार आहे.
- डॉ. किरण पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी (राजिप)

Web Title: Todays Latest Marathi News Ali22b37506 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..