लेटलतीफ कर्मचाऱ्यांना आळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लेटलतीफ कर्मचाऱ्यांना आळा
लेटलतीफ कर्मचाऱ्यांना आळा

लेटलतीफ कर्मचाऱ्यांना आळा

sakal_logo
By

पाली, ता. १४ (वार्ताहर) : नागरिकांची कामे वेळेत व्हावीत आणि लेटलतीफ कर्मचाऱ्यांवर आळा बसावा, यासाठी तहसील व पंचायत समिती कार्यालयात बायोमेट्रिक मशीन बसवण्यात आले आहे. मशीन बसवल्याने कर्मचारी आता तरी वेळेत कार्यालयात पोहचतील आणि सरकारी कामांना वेग मिळेल, अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
पाली तहसील आणि इतर शासकीय कार्यालयातील लेटलतीफ व मुख्यालयी न राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी. कार्यालयात बायोमेट्रिक मशीन बसवण्यात यावी, या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते रवींद्रनाथ ओव्हाळ यांनी मे महिन्यात पाली तहसील कार्यालय आवारात उपोषण केले होते. त्या उपोषणाची दखल घेत तहसीलदार दिलीप रायन्नवार यांनी पाली तहसील कार्यालय आणि पाली पंचायत समितीत गटविकास अधिकारी यादव यांनी गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर बायोमेट्रिक मशीन बसवले आहे. यामुळे लेटलतीफ कर्मचाऱ्यांना आळा बसला आहे. शासकीय कार्यालयातील कर्मचारी आता वेळेवर येत असल्याने कार्यालयात कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांची कामे वेळेत होत आहेत. याबद्दल तालुक्यातील नागरिकांनी ओव्हाळ यांचे आभार मानले.

सरकारी कार्यालयात बायोमेट्रिक मशीन बसवल्याने कर्मचारी वेळेत पोहचत आहेत आणि लवकर बाहेर पडत नाहीत. मात्र, मुख्यालयी न राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कार्यवाही करून त्यांना तेथेच राहण्यास आदेश काढल्यास सर्वसामान्य नागरिकांची सरकारी कामे अधिक गतिमान होतील.
- रवींद्रनाथ ओव्हाळ, सामाजिक कार्यकर्ते, पाली

Web Title: Todays Latest Marathi News Ali22b37509 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..