काशिद समुद्रकिनारा चकाचक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

काशिद समुद्रकिनारा चकाचक
काशिद समुद्रकिनारा चकाचक

काशिद समुद्रकिनारा चकाचक

sakal_logo
By

काशिद समुद्रकिनारा चकाचक
अलिबाग, ता. १३ : सरकारच्या ''स्वच्छ सागर सुरक्षित सागर'' अभियानांतर्गत मुरूड तहसील व काशिद ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने तहसीलदार रोहन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली काशिद समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. पावसाळ्यात या समुद्र किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात कचरा वाहून आला होता. साधारण पाच टन कचरा गोळा करून त्याची योग्य विल्हेवाट लावून किनारा चकाचक करण्यात आला.
या मोहिमेत तहसीलदार रोहन शिंदे, नायब तहसीलदार रवींद्र सानप, महसूल नायब तहसीलदार गोविंद कोटंबे, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुभाष वाणी, नांदगाव मंडळ अधिकारी, तलाठी (नांदगाव), महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाचे सहायक बंदर निरीक्षक महेश होले, यशोधन कुलकर्णी, काशिद ग्रामपंचायत सरपंच नम्रता कासार-खेडेकर, सदस्य संतोष राणे, ग्रामसेवक सुशांत ठाकूर, शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख तथा संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे तालुकाध्यक्ष भरत बेलोसे यांच्यासह ग्रामपंचायतीचे कर्मचारी, गावातील प्रतिष्ठीत नागरिक सहभागी झाले होते.

Web Title: Todays Latest Marathi News Ali22b37512 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..