१०३ गावांचे अचूक सीमांकन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

१०३ गावांचे अचूक सीमांकन
१०३ गावांचे अचूक सीमांकन

१०३ गावांचे अचूक सीमांकन

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. १३ : ज्या महसुली गावांच्या गावठाणाची मोजणी झालेली नाही, अशा गावठाणांचे सर्वेक्षण करण्याचे काम स्वामित्व योजनेंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास खात्यांतर्गत सुरू आहे. खालापूर तालुक्यातील एकूण १५३ गावे व वाड्यांपैकी गावठाण भूमापन न झालल्या १०३ गावांची अत्याधुनिक ड्रोनद्वारे भारतीय सर्वेक्षण विभाग यांच्यामार्फत अचूक पद्धतीने मोजणी करण्यात आली.
खालापूर तालुक्यात ड्रोनद्वारे गावठाणाचे भूमापन नुकतेच करण्यात आले होते. या सर्वेक्षणानंतर मोजणी नकाशे भारतीय सर्वेक्षण विभागाकडून तयार केले जातात. प्रत्यक्षात जागेवर जाऊन भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी खातरजमा करून ते नकाशे डिजिटाईज करून घेतात. खालापूर गावातील १०३ गावांचे ड्रोन सर्वेक्षणाचे काम नुकतेच पूर्ण झाले असून ४५ गावांचे प्रत्यक्ष जागेवर जाऊन चौकशीचे कामदेखील पूर्ण झालेले आहे. त्यापैकी ३८ गावांच्या मिळकत पत्रिका तयार असून १३ गावांच्या सनद तयार झालेल्या आहेत. सनद हा शासनाने मालकी हक्काचा पुरावा म्हणून घोषित केलेला आहे. या सनद वाटप कार्यक्रमासाठी विशेष शिबिर घेण्यात आले असून बुधवार (ता. ७) रोजी मौजे विणेगाव, इसांबे, तोंडली, ढेकू, वारद, कुंभिवली, सारसन, लोहोप, स्वाली, पौद, केळवली या गावांच्या सनद वितरणाचा कार्यक्रम ग्रामपंचायत कार्यालयात घेण्यात आला. या वेळी संबंधित गावांचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामसेवक आदी उपस्थित होते.

मिळकतधारकांकडून चांगला प्रतिसाद
कोकण प्रदेश, मुंबई भूमी अभिलेखचे उपसंचालक जयंत निकम आणि रायगड जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख सचिन इंगळी यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली खालापूर भूमी अभिलेख उपअधीक्षक शरद काळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी नियोजन करून ही मोहीम यशस्वी केली आहे. तसेच मिळकतधारकांकडून सनद घेण्यासाठी चांगला प्रतिसाद मिळात आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Ali22b37518 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..