लाईफ लाईन एक्स्प्रेस आज रायगडमध्ये | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लाईफ लाईन एक्स्प्रेस आज रायगडमध्ये
लाईफ लाईन एक्स्प्रेस आज रायगडमध्ये

लाईफ लाईन एक्स्प्रेस आज रायगडमध्ये

sakal_logo
By

अलिबाग, ता. १४ : जिल्ह्यातील गोरगरीब रुग्णांना आरोग्य सेवेचा लाभ घेता यावा, तसेच त्यांच्यावर मोफत शस्‍त्रक्रिया करता याव्यात यासाठी १५ ते ३० सप्टेंबरदरम्यान लाईफलाईन एक्स्प्रेस रायगड जिल्ह्यात दाखल होणार आहे. गोरेगाव रोड रेल्वेस्थानकात ही गाडी थांबणार आहे.
लाईफलाईन एक्स्प्रेस ही रुग्‍णालय ट्रेन देशातील वेगवेगळ्या भागातून प्रवास करते. आपल्या नियोजित कार्यक्रमानुसार ती वेगवेगळ्या स्टेशन्सवर थांबते आणि तिथल्या स्थानिक रुग्णांवर उपचार केले जातात. देशातील अनेक शहरांमध्ये गेल्यानंतर ट्रेन तिथे काही दिवस मुक्काम करते. या दरम्यान तिथल्या रुग्णांवर उपचार आणि शस्‍त्रक्रिया केली जाते. एखाद्या आजारावर ट्रेनमध्ये उपचार होत नसेल तर जवळच्या मोठ्या रुग्णालयात रुग्णाला दाखल करण्याचा सल्ला दिला जातो. ही ट्रेन स्थानिक प्रशासन आणि अनेक स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून रुग्णांवर उपचार करते. १५ सप्टेंबरपासून गाडी रायगड जिल्ह्यात दाखल होणार आहे.
रायगड जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्‍य केंद्रांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील मोतीबिंदू असणारे, कर्णबधिर रुग्‍ण, ओठ दुभंगलेले, शारीरिक व्याधी अशा प्रकारच्या सर्व रुग्णांचा शोध घेऊन वेळापत्रकानुसार प्राथमिक आरोग्य केंद्र, गोरेगाव व उपजिल्हा रुग्णालय, रोहा येथे संपर्क साधावा. तसेच आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व आरोग्य सेविका, आशा सेविका आणि अंगणवाडी सेविकांना कार्यक्रमाची माहिती देऊन ती नागरिकांपर्यंत पोहचवावी, अशा सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केल्या आहेत.

पुरविण्यात येणाऱ्या सेवा :
• डोळ्यांचे परिक्षण, मोतीबिंदू शस्‍त्रक्रिया, मोफत चश्मे वाटप
• कानांचे विकार असणाऱ्या रुग्णांचे परिक्षण व शस्‍त्रक्रिया
• वाकड्या पायांची तपासणी किंवा शस्‍त्रक्रिया (१४ वर्षांखालील)
• फाटलेले ओठ तसेच भाजलेल्या शरीरावरील परिक्षण व शस्‍त्रक्रिया
• स्त्री-रोग परिक्षण (स्तन व गर्भाशय, ग्रीव्हा, कॅन्सर परिक्षण)
• दातांचे परिक्षण व उपचार

Web Title: Todays Latest Marathi News Ali22b37521 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..