सागरी सुरक्षा रक्षक आर्थिक संकटात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सागरी सुरक्षा रक्षक आर्थिक संकटात
सागरी सुरक्षा रक्षक आर्थिक संकटात

सागरी सुरक्षा रक्षक आर्थिक संकटात

sakal_logo
By

प्रमोद जाधव ः सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. १५ ः पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून सागरी सुरक्षा मजबूत करण्याचे काम सागरी सुरक्षा रक्षक करीत आहेत. परंतु हे सुरक्षा रक्षक तीन महिन्यांपासून मानधनापासून वंचित आहेत. मानधन वेळेवर मिळत नसल्याने त्‍यांच्यावर आर्थिक संकट ओढावले आहेत.
२६/११ चा हल्ला, बॉम्ब स्फोटामुळे मुंबईत पोलिस जवानांसह शेकडो नागरिकांना प्राण गमवावे लागले आहेत. हे सर्व हल्ले सागरी मार्गातून झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्‍यामुळे नागरी व सागरी सुरक्षेच्या दृष्टीने राज्य सरकारने कंत्राटी स्वरूपात सुरक्षा रक्षक घेण्याचा निर्णय घेतला.
किनाऱ्यांवरील सागरी सुरक्षा अधिक भक्कम करण्यासाठी पोलिसांच्या बरोबरच रक्षक नेमण्यात आले. समुद्र व सागरी किनाऱ्यांवरील काही संशयित हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी आठ वर्षांपासून रायगड जिल्ह्यात सागरी सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. त्‍यांना प्रशिक्षणही देण्यात आले आहे.
जिल्ह्यात सद्यस्‍थितीत ६८ सुरक्षा रक्षक कार्यरत असून त्‍यांना मत्स्य विभागाकडून मानधन दिले जाते. दर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मानधन दिले जाते. परंतू जूनपासून मानधनच मिळाले नसल्याचे समोर आले आहे. गणेशोत्सवात विनामानधन काम करण्याची वेळ या सुरक्षा रक्षकांवर आली आहे. एका बाजूला शासन सागरी सुरक्षेबाबत उपाययोजना करीत आहे, तर दुसऱ्या बाजूला सागरी सुरक्षा रक्षकांना मानधन देण्यास उदासीन दिसते. सरकारच्या दुटप्पी भुमिकेमुळे सागरी किनारी रात्रीचा दिवस करून सेवा देणाऱ्या सुरक्षा रक्षकांवर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे.


सुरक्षा रक्षकांच्या कामांवर दृष्टीक्षेप
किनाऱ्यांवरील संशयित हालचालीवर लक्ष ठेवणे
बोटींना टोकण देणे.
मत्‍स्‍य व्यवसायाला मदत करणे


सुरक्षा रक्षकांची हजेरी पट मुंबई येथील गृह विभागाकडे पाठविला जातो. त्यानंतर तेथून निधी उपलब्ध होतो. निधी उपलब्ध झाल्यावर तातडीने दोन दिवसात त्यांना मानधन देण्यात येते. दोन महिन्यांपासून निधी नसल्याने मानधन रखडले आहे. याबाबत सरकारकडे मागणी केली आहे.

- सुरेश भारती, सहायक आयुक्त, मत्स्य विभाग, रायगड

Web Title: Todays Latest Marathi News Ali22b37537 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..