कर्जतमध्ये पाच बैलांना संसर्ग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कर्जतमध्ये पाच बैलांना संसर्ग
कर्जतमध्ये पाच बैलांना संसर्ग

कर्जतमध्ये पाच बैलांना संसर्ग

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

अलिबाग, ता. १८ : जिल्ह्यात लम्पी रोगाने ५ बैल बाधित झाले असून एकाचा मृत्यू झाला. त्‍यामुळे पशुसंवर्धन विभागाने लसीकरणाचा वेग वाढवला आहे. तालुक्यातील खांडस, वावे, पिंपळोली आणि आंबवली येथील शेतकऱ्यांनी १५ दिवसांपूर्वी चाकणच्या बाजारातून खिल्‍लारी जातीचे पाच बैल शर्यतीसाठी विकत आणले होते. यातील वयाने लहान असलेल्या एका बैलाची प्रकृती खालावल्याने मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी रत्नाकर काळे यांनी शुक्रवारी घेतलेल्‍या पत्रकार परिषदेत दिली. ११ संशयित जनावरांचे रक्ताचे नमुने जमा करून भोपाळ येथील केंद्रीय प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. यातील ५ जनावरांचे नमुने पॉझिटीव्ह आले असून त्यांना मालकांच्या ताब्यातच विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.

रोगाचा संसर्ग वाढू नये यासाठी ३४ कर्मचाऱ्यांचे पथक तयार केले असून लसीकरण सुरू आहे. आतापर्यंत चार हजार जनावरांचे लसीकरण झाले असून ६ हजार लशींचा साठा जिल्ह्याला उपलब्ध झाला आहे. पाळीव जनावरांच्या वाढत्या संकटाला सामोरे जाण्यासाठी पशुसंवर्धन विभागाच्या सर्व रिक्त जागा तत्काळ भरण्याच्या सूचना राज्य सरकारने दिल्या आहेत.
- डॉ. महेंद्र कल्‍याणकर, जिल्‍हाधिकारी

Web Title: Todays Latest Marathi News Ali22b37555 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..