वीजवाहिन्‍यांना झाडाझुडपांचा विळखा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वीजवाहिन्‍यांना झाडाझुडपांचा विळखा
वीजवाहिन्‍यांना झाडाझुडपांचा विळखा

वीजवाहिन्‍यांना झाडाझुडपांचा विळखा

sakal_logo
By

अलिबाग, ता. १९ (बातमीदार) ः अलिबाग-रोहा मार्गावर असलेल्या फणसापूर परिसरात रस्त्यालगत असलेल्या विजेच्या तारांना झुडपांसह वेलींनी विळखा घातला आहे. त्‍यामुळे वीजवाहिन्‍या तुटण्याची भीती असून पादचाऱ्‍‌यांसह वाहनचालक, प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. तक्रार करूनही महावितरणचे याकडे दुर्लक्ष होत असल्‍याचे परिसरातील नागरिकांचे म्‍हणणे आहे.
अलिबाग-रोहा मार्गावरील फणसापूर बस स्थानक ते भोनंग फाटा या ठिकाणी असलेल्‍या वीज खांबावरून परिसरातील अनेक गावांना वीजपुरवठा केला जातो. नागरिकांना अखंडित वीज मिळावी, यासाठी दर आठवड्याला शटडाऊन घेऊन विजेच्या तारा, खांब यांच्या देखभाल-दुरुस्तीची कामे केली जातात. मात्र अनेक दिवसांपासून येथील वीज खांबांसह वाहिन्यांवर झाडाझुडपांसह वेलींनी विळखा घातला आहे. फणसापूरमध्ये महावितरणचे कनिष्ठ अभियंता यांचे कार्यालय आहे. तरीदेखील यंत्रणेचे दुर्लक्ष होत आहे, एखादी दुर्घटना घडल्‍यावरच महावितरणला जाग येईल का, असा प्रश्‍न नागरिकांकडून उपस्‍थित होत आहे.

खुल्या रोहित्रामुळे सुरक्षेचा प्रश्न
अलिबाग-रामराज रस्त्यावरील बापळे गावाजवळ महावितरणने रोहित्र बसविले आहे. मात्र त्‍यावर झाकण बसवण्यात आलेले नाही. खुल्‍या रोहित्रामुळे सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे. ज्या ठिकाणी रोहित्र बसविले आहे, त्या ठिकाणी नागरिकांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. काही शेतकऱ्यांचा येण्या-जाण्याचा मार्ग आहे. तसेच बाजूला मंदिर आहे. त्यामुळे परिसरात कायम वर्दळ असते. त्‍यामुळे दुर्घटना घडण्याची शक्‍यता आहे.

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सतत पाऊस सुरू आहे. अलर्टही जारी केला आहे. ग्राहकांना चांगल्या सेवा मिळाव्यात यासाठी यंत्रणा काम करीत आहे. ज्या ठिकाणी वीज खांब, वाहिन्यांवर झाडेझुडपे वाढली आहेत, त्‍या काढण्याच्या सूचना केल्‍या आहेत. खुल्‍या रोहित्रांवर झाकणे बसवण्यात येतील. याबाबत जिल्ह्यात सर्वत्र देखभाल-दुरुस्‍ती अभियान राबविला जाईल.
- आय. ए. मुलाणी, अधीक्षक अभियंता, महावितरण

Web Title: Todays Latest Marathi News Ali22b37579 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..