भर पावसात सरपंचांचे उपोषण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भर पावसात सरपंचांचे उपोषण
भर पावसात सरपंचांचे उपोषण

भर पावसात सरपंचांचे उपोषण

sakal_logo
By

अलिबाग, ता. १९ : मुसळधार पाऊस पडत असला तरी अलिबाग तालुक्यातील रेवस परिसरातील कोप्रोली, मिळखतखार, सारळ, नवखार आणि रेवस या पाच ग्रामपंचायतीमधील गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी करावी लागणारी वणवण थांबलेली नाही. यामुळे ग्रामपंचायतींच्या सरपंचांनी सोमवारी (ता. १९) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण आंदोलन सुरू केले आहे.
रेवस ग्रामपंचायत हद्दीत रेवस कोळीवाडा येथे कित्येक वर्षे असलेली पिण्याच्या पाण्याची समस्या सुटलेली नाही. सरपंच म्हणून २०१६ पासून कित्येक वेळा उपोषणे केली. मात्र, पाण्याची समस्या सोडवण्याचे केवळ कागदोपत्री आश्वासन दिले जाते. २००८ मध्ये भारत निर्माण योजनेसाठी ३३ लाख मंजूर केले असता कुठलाही पाण्याचा थेंब रेवस कोळीवाड्यासाठी पोहचलेला नाही. अधिकारी व ठेकेदार यांच्या संगनमताने ही योजना पूर्ण झाल्याचे कागदोपत्री दाखवण्यात आले आहे, असा आरोप रेवसचे सरपंच मच्छिंद्र पाटील
यांनी केला. रेवस कोळीवाड्याला न्याय मिळाल्याशिवाय शांत बसणार नाही. ठोस निर्णय न झाल्यास आत्मदहन करणार आहे. याला सर्वस्वी जबाबदार प्रशासन राहील, असा इशारा पाटील यांनी दिला.
रेवस पाणीपुरवठा योजनेतील झोन १ मध्ये समाविष्ट होणाऱ्या कोप्रोली, मिळखतखार, सारळ, नवखार आणि रेवस या पाच ग्रामपंचायतींमधील पाणीपुरवठ्यासाठी ग्रामपंचायतींच्या सरपंचांनी पाण्यासाठी अनेक वेळा उपोषणे केली आहेत. सरपंच मच्छिंद्र पाटील, डावली रांजणखार ऊर्फ नवखारचे हेमंत पाटील, मिळकतखारचे गिरीश कडवे, बाळाराम म्हात्रे, ज. गो. पाटील, चंद्रकांत म्हात्रे, विवेक पेरेकर आदींसह ग्रामस्थ सोमवारी (ता. १९) सकाळी ९ वाजल्यापासून अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत. त्यांना पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे चिटणीस अॅड. प्रवीण ठाकूर, राजिपचे माजी विरोधी पक्षनेते सुरेंद्र म्हात्रे, सामाजिक कार्यकर्ते दिलीप जोग, संजय सावंत, फिरोज घट्टे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली.

Web Title: Todays Latest Marathi News Ali22b37592 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..