दीपक दंत यांना ‘शिक्षण भूषण’ पुरस्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दीपक दंत यांना ‘शिक्षण भूषण’ पुरस्कार
दीपक दंत यांना ‘शिक्षण भूषण’ पुरस्कार

दीपक दंत यांना ‘शिक्षण भूषण’ पुरस्कार

sakal_logo
By

पाली, ता. १९ (वार्ताहर) ः सुधागड तालुक्यातील रायगड जिल्‍हा परिषद शाळा सिध्देश्वर (खुर्द) आदिवासी वाडी येथील शिक्षक दीपक पांडुरंग दंत यांना रविवारी ‘शिक्षण भूषण’ पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. दंत करीत असलेल्या सामाजिक आणि शैक्षणिक कार्याचा मानवजातीच्या उत्थानासाठी खूप मोठा फायदा होत आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्‍यांना पुरस्‍कृत करण्यात आल्‍याचे यावेळी मान्यवरांनी सांगितले. पुरस्काराबद्दल विविध शिक्षक संघटना तसेच सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातून, झाप ग्रुप मराठा समाज, आपटवणे गाव, सिध्देश्वर खुर्द गाव व शाळा व्यवस्थापन समितीकडून दंत यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Ali22b37593 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..