वडके विद्यालयात हिंदी दिवस साजरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वडके विद्यालयात हिंदी दिवस साजरा
वडके विद्यालयात हिंदी दिवस साजरा

वडके विद्यालयात हिंदी दिवस साजरा

sakal_logo
By

हिंदी दिवसानिमित्त विविध स्‍पर्धा

अलिबाग : नेहरू युवा केंद्र संघटन, अलिबाग आणि ओॲसिस बहुउद्देशीय समाजाभिमुख संस्था, रेवदंडा यांच्या संयुक्त विद्यमाने चोंढी येथील वडके विद्यालयात राष्ट्रीय हिंदी दिवस साजरा करण्यात आला. यावेळी नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी निशांत रौतेला, प्रतीक कोळी, कार्याध्यक्ष यज्ञेश पाटील, मुख्याध्यापक भरत दळवी, उपमुख्याध्यापक मधुकर बावीस्कर, पर्यवेक्षिका मीनाक्षी भारंबे, सांस्कृतिक समिती प्रमुख लक्ष्मी पाटील, ग्रुप ऑफ युथ मूव्हमेंटच्या सहसचिव तनुश्री सुतार आदी मान्यवर उपस्थित होते. वृत्तचित्र वाचन, काव्य वाचन, प्रश्‍नमंजूषा आणि हिंदी संवाद या स्पर्धा दोन सत्रात संपन्न झाल्या. तर तृतीय सत्रात आयोजित निबंध स्‍पर्धा घेण्यात आल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तनुश्री सुतार, सूत्रसंचालन प्रशालेचे अध्यापक निवृत्ती गर्दे तर आभार रेखा भोईर यांनी मानले

वडके विद्यालय विद्यार्थी दिन साजरा
अलिबाग : चोंढी येथील स.म. वडके विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमध्ये सोमवारी विद्यार्थी दिन उत्साहात संपन्न झाला. सकाळच्या सत्रात बारावीच्या विद्यार्थ्यांनी अकरावीच्या विद्यार्थ्यांना अध्यापन केले. व दुपारच्या सत्रात दहावीच्या विद्यार्थ्यांनी पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांना अध्यापन केले. विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, सत्र प्रमुख, प्रयोगशाळा सहायक आदी भूमिकाही उत्तमरित्‍या पार पाडल्या. कार्यक्रमाचे नियोजन सत्र प्रमुख बी.जे. पाटील, सुनिल पाटील, सुवेगा राऊत यांनी केले.

Web Title: Todays Latest Marathi News Ali22b37600 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..