नव्या पालकमंत्र्यांची पहिलीच बैठक मुंबईत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नव्या पालकमंत्र्यांची पहिलीच बैठक मुंबईत
नव्या पालकमंत्र्यांची पहिलीच बैठक मुंबईत

नव्या पालकमंत्र्यांची पहिलीच बैठक मुंबईत

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. २८: रायगड जिल्ह्याचे नवे पालकमंत्री म्हणून उदय सामंत यांची नियुक्ती झाल्यानंतर शिंदे गटातील कार्यकर्ते त्यांचे जिल्ह्यात जल्लोषात स्वागत करण्यास उत्सुक होते; परंतु या कार्यकर्त्यांना आणखी काही दिवस वाट पहावी लागणार आहे. नवे पालकमंत्री उदय सामंत यांनी रायगडमधील रखडलेल्या विकासकामांचा मुंबईतील सह्याद्री शासकीय विश्रामगृहात अधिकाऱ्यांची बैठकीत आढावा घेतला.
विकासकामे जलद गतीने पूर्ण करावीत, सर्वांगीण विकासाचे ध्येय ठेवावे, ही ध्येयपूर्ती साधताना स्थानिक लोकप्रतिनिधींच्या मताला महत्त्व देत अधिकाऱ्यांनीही लोकोपयोगी नावीन्यपूर्ण कामे सुचवण्याच्या सूचना केल्या.
आतापर्यंत नव्या पालकमंत्र्यांची पहिली आढावा बैठक जिल्ह्यात होण्याची परंपरा होती, ती परंपरा पहिल्यांदाच मोडली गेली. बैठकीस जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, पोलिस अधीक्षक अशोक दुधे उपस्‍थित होते. तर जिल्हा नियोजन अधिकारी जयसिंग मेहत्रे यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे वार्षिक नियोजन आराखडा सादर केला.


बैठकीत दिलेल्‍या सूचना
- टंचाईचे प्रस्ताव हे वेळेपूर्वी सादर करावे, जेणेकरून प्रत्यक्ष टंचाई उद्भवल्यास आवश्यक कार्यवाही योग्य पद्धतीने करता येईल
- नगरपालिकांनी मिनी फायर ब्रिगेड व्हॅनसाठी प्रस्ताव सादर करावेत.
- प्राथमिक शाळांनी सोयीसुविधा व अडचणींबाबतचा अहवाल सादर करावा.
- माध्यमिक शाळांमधील अतिरिक्त खोल्यांची माहिती सादर करावी. उत्कृष्ट कामकाज, उत्कृष्ट निकाल असणाऱ्या शाळांसाठी ‘मॉडर्न लॅब’ ची निर्मिती करणार
- जिल्ह्यात कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यासाठी आवश्यक कार्यवाही तत्काळ सुरू करावी
- ग्रामीण रुग्णालयात ‘मॉड्युलर ऑपरेशन थिएटर’ उभारण्यासाठी आवश्यक प्रयत्न करणार
- लम्‍पी आजाराविषयी गांभीर्याने लक्ष देवून जनावरांचे लसीकरण तत्काळ पूर्ण करावे.