बीकेसीवरील मेळाव्यासाठी २५ हजार कार्यकर्ते जाणार! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बीकेसीवरील मेळाव्यासाठी २५ हजार कार्यकर्ते जाणार!
बीकेसीवरील मेळाव्यासाठी २५ हजार कार्यकर्ते जाणार!

बीकेसीवरील मेळाव्यासाठी २५ हजार कार्यकर्ते जाणार!

sakal_logo
By

अलिबाग, ता. ३ : शिवसेनेच्या शिंदे गटास बीकेसीवर दसरा मेळावा घेण्यास परवानगी देण्यात आली. ५ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या मेळाव्यासाठी रायगडमधून २५ हजार कार्यकर्ते जाणार आहेत. याची जय्यत तयारी सुरू असून गावागावांत मेळाव्यास जाण्यासाठी कार्यकर्ते सज्ज झाल्याची माहिती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजा केणी यांनी दिली.
मुंबईपासून जवळचा जिल्हा असल्याने रायगड जिल्ह्यातून कार्यकर्ते नेणे सोपे आणि कमी खर्चाचे आहे. वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी एसटी बस, खासगी बस बुक करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर समुद्रामार्गे जाण्यासाठी रो-रो सेवा मेळाव्याच्या दिवसी बुक करण्यात आली. मेळाव्यानिमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसैनिकांना कोणता मंत्र देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दसरा मेळव्यासाठी रायगड जिल्‍ह्यातून किती कार्यकर्ते येणार, याचा तालुका पदाधिकाऱ्यांकडून आढावा घेतला जात आहे. हे कार्यकर्ते कोणत्या गावातून निघणार, परत येताना त्यांना बस शोधण्यात अडचणी येऊ नये यासाठी काय करावे, याचीही माहिती दिली जात आहे.
- राजा केणी, जिल्‍हाप्रमुख, शिंदे गट