एलमा-पैलमा गणेश देवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एलमा-पैलमा गणेश देवा
एलमा-पैलमा गणेश देवा

एलमा-पैलमा गणेश देवा

sakal_logo
By

पाली, ता. ४ (वार्ताहर) ःशारदीय नवरात्रोत्सवाच्या औचित्याने सुधागड तालुक्यातील नेणवलीतील रायगड जिल्हा परिषद शाळेत सोमवारी भोंडल्‍याचे आयोजन केले होते. कार्यक्रमासाठी आतोणे केंद्राच्या केंद्रप्रमुख कल्पना पाटील उपस्थित होत्या. प्रथम हत्तीच्या प्रतिमेची पूजा करण्यात आली. भोंडल्यासाठी गावातील महिला पालक, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व शाळेतील विद्यार्थिनी यांनी फेर धरून पारंपरिक गाणी म्हणून त्यावर ताल धरला. त्याचबरोबर गरबाही खेळले. एलमा-पैलमा गणेश देवा, अक्कण माती-चिक्कण माती, एक लिंबू झेलू बाई यासारखी हादगा व भोंडल्याच्या गीतावर उपस्‍थितांनी फेर धरला. कार्यक्रमाचे नियोजन शाळेचे मुख्याध्यापक संतोष हरपाल, उपशिक्षक राजेंद्र अंबिके व गणपत वरगडे यांनी केले होते.

हस्त नक्षत्रात पडणारा म्हणजे हत्तीचा पाऊस हा नुकसानकारक असतो. त्यासाठी सर्व जण नवरात्रीत घरी थांबतात. अशा भोंडला किंवा हादगा कार्यक्रम करून आनंद घ्यावा, अशी पूर्वापार प्रथा आहे.
- कल्पना पाटील, केंद्रप्रमुख, केंद्र आतोणे