‘व्यक्‍तीच्या विकासात वाचन हेच सर्वोत्तम साधन’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘व्यक्‍तीच्या विकासात वाचन हेच सर्वोत्तम साधन’
‘व्यक्‍तीच्या विकासात वाचन हेच सर्वोत्तम साधन’

‘व्यक्‍तीच्या विकासात वाचन हेच सर्वोत्तम साधन’

sakal_logo
By

अलिबाग, ता. १५ : जेएसएम महाविद्यालयात ग्रंथालय व माहिती स्रोत केंद्र विभाग आणि भाषा व वाङ्मय अभ्यास मंडळातर्फे नुकताच ‘वाचन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अॅड. गौतम पाटील उपस्थित होते. पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील यांची या वेळी विशेष उपस्थिती लाभली. व्यक्‍तीच्या सर्वांगीण विकासाकरिता वाचन हेच सर्वोत्तम साधन असल्‍याचा प्रेरक संदेश प्रा. डॉ. निळकंठ शेरे यांनी विद्यार्थ्यांना दिला. डॉ. मोहसीन खान यांनी कवी सफदर हाश्मी यांच्या ‘किताबे कुछ कहना चाहती है’ या कवितेचे वाचन केले. या वेळी वाचन संस्कृतीच्या प्रसाराकरिता ग्रंथालयात ‘जेएसएम वाचन कट्टा’ सुरू करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची प्रेरणा निर्माण करण्यासाठी व वाचनाची आवड वृद्धिंगत करण्याच्या दृष्टीने ‘पुस्तक’ या विषयावरील स्वरचित काव्यलेखन व काव्यवाचन, ‘वाचन संस्कृतीचे जतन आवश्यक आहे’, ‘२१ व्या शतकात ग्रंथालयांचे महत्त्व’, ‘मला आवडलेले पुस्तक’ या विषयांवरील निबंधलेखन, प्रश्नमंजूषा अशा विविध स्पर्धा व ‘वाचनध्यास’ या उपक्रमांतर्गत सलग आठ तास वाचन, नो गॅझेट डे, अभिवाचन अशा विविध उपक्रमांचे आयोजन यावेळी करण्यात आले होते.