समुद्र किनारा पर्यटकांनी फुलला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

समुद्र किनारा पर्यटकांनी फुलला
समुद्र किनारा पर्यटकांनी फुलला

समुद्र किनारा पर्यटकांनी फुलला

sakal_logo
By

अलिबाग, ता.२५(बातमीदार)ः दिवाळीच्या निमित्ताने शाळांना सुट्टी पडली आहे. त्यामुळे पर्यटकांनी सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी अलिबागमधील पर्यटन स्थळांना पसंती दर्शविली आहे. अलिबाग समुद्रकिनारा पर्यटकांनी फुलून गेला असून सागरी खेळांसह किनाऱ्यावर फिरण्याचा आनंद पर्यटक मनमुरादपणे घेत आहेत.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर २ नोव्हेंबरपर्यंत शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मुंबई, पुणे येथील पर्यटक या सुट्टीमध्ये अलिबागमध्ये दाखल झाले आहेत. समुद्रकिनारी पर्यटकांनी गर्दी केली आहे. काही पर्यटक त्यांच्या मित्र मंडळींसमवेत तर काही पर्यटक त्यांच्या कुटुंबीयांसमवेत अलिबागमध्ये आले असून किनाऱ्यावरील भारत - पाकिस्तान लढ्यातील रणगाडा सेल्फी काढणाऱ्यांसाठी आकर्षण ठरत आहे.
----------------------------------------
किनाऱ्यावर जीवरक्षक तैनात
अलिबाग समुद्रकिनारा पर्यटकांनी गजबजल्याने स्थानिकांना रोजगाराचे साधन खुले झाले आहे. अशातच पर्यटन वाढीला चालना देण्यासाठी नगरपालिकेने पर्यटकांसाठी सिमेंटचे बाक व अन्य सुविधा उपलब्ध केल्या आहेत. शिवाय अति-उत्साहामध्ये खोल समुद्रात जाणाऱ्या पर्यटकांसाठी जीवरक्षक देखील तैनात केले आहेत.