जिल्‍हास्‍तरीय बुद्धिबळ स्‍पर्धेत ११३ जणांचा सहभाग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्‍हास्‍तरीय बुद्धिबळ स्‍पर्धेत ११३ जणांचा सहभाग
जिल्‍हास्‍तरीय बुद्धिबळ स्‍पर्धेत ११३ जणांचा सहभाग

जिल्‍हास्‍तरीय बुद्धिबळ स्‍पर्धेत ११३ जणांचा सहभाग

sakal_logo
By

अलिबाग, ता. २७ : रायगड जिल्हा बुद्धिबळ संघटना आणि व्ही. जी. पाटील एज्युकेशनल फाऊंडेशन, तसेच रोटरी क्लब ऑफ पाताळगंगाच्या संयुक्त विद्यमाने अलिबाग तालुक्यातील खिडकी येथे जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत ११३ स्पर्धकांनी सहभाग घेतला. खुल्या गटात प्रथम क्रमांकाचा मानकरी उरणचा धीरज पाटील राहिला. द्वितीय क्रमांक गोवर्धन वसावे, पनवेल; तृतीय क्रमांक गणेश पाटील, अलिबाग यांनी मिळवला.
११ वर्षांखालील जिल्हा निवड स्पर्धेत मुलांच्या गटात प्रथम क्रमांक इ. अभिषेक, पनवेल याने, दुसरा कौस्तुभ भगत, पनवेल, तृतीय क्रमांक आर्यन मोडक, पेण याने तर उत्तेजनार्थ बक्षीस रुद्र कुतवाल, राज पेढवी यांनी मिळवला.
मुलींच्या गटात प्रथम क्रमांक स्मिती शेडगे, उरण, द्वितीय आरोही पाटील, तृतीय क्रमांक भार्गवी नायडू, गोरेगाव हिने, तर उत्तेजनार्थ पारितोषिक शर्वरी पाटील, सानवी म्हात्रे यांनी पटकावले. जिल्हास्तरीय स्पर्धांचे आयोजन व्ही. जी. पाटील एज्युकेशनल फाऊंडेशन विस्वस्त आल्हाद पाटील यांनी केले होते.

अलिबाग : रायगड जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना सन्मानचिन्ह व पारितोषिक देऊन गौरवण्यात आले.