‘गेल’ विरोधात आंदोलनाची हाक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘गेल’ विरोधात आंदोलनाची हाक
‘गेल’ विरोधात आंदोलनाची हाक

‘गेल’ विरोधात आंदोलनाची हाक

sakal_logo
By

अलिबाग, ता. ३ (बातमीदार)ः अलिबाग तालुक्यातील उसर येथील गेल कंपनीत राज्य सुरक्षा दलाच्या भरतीमध्ये २५ टक्के स्थानिकांची भरती करावी, तसेच रोजगार देण्यासाठी उसर प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटना लढा देत आहे. मात्र, कंपनी व्यवस्थापनाकडून उपेक्षा होत असल्याने आक्रमक झालेल्या प्रकल्पग्रस्तांनी १५ नोव्हेंबरनंतर ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा दिला आहे.
तालुक्यातील उसर या ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून गेल कंपनी आहे. या कंपनीच्या उभारणीसाठी शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या. नाईक कुणे, कंटक कुणे, धसाडे कुणे, उसर, घोटवडे, मल्याण या गावांतील २४७ शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या आहेत; परं, स्थानिकांच्या समस्यांकडे कंपनी प्रशासन दुर्लक्ष करत आहे. या कंपनीमध्ये विविध कामे सुरू आहेत. मात्र, स्थानिकांना प्राधान्य देण्याऐवजी प्रकल्पग्रस्तांना डावलून परप्रांतीय मजुरांची नेमणूक केली जात आहे. अशातच ६५ स्थानिक कामगारांपैकी काहींना कमी देखील करण्यात आले आहे. त्यामुळे कंपनी व्यवस्थापनाकडून प्रकल्पग्रस्तांची उपेक्षा होत असल्याने आमदार प्रशांत ठाकूर यांनी या प्रकरणी लक्ष घालावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
़़़़़़़़़़़़़़़--------------------------------------------
उसर येथील गेल प्रकल्पग्रस्तांना रोजगार मिळावा. स्थानिकांना कॉन्ट्रॅक्ट मिळावा, अशी आग्रही मागणी प्रकल्पग्रस्तांची आहे. रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांच्यासमवेत चर्चा करून प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे.
- प्रशांत ठाकूर, आमदार