पथनाट्यातून भ्रष्टाचार मुक्तीचा संदेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पथनाट्यातून भ्रष्टाचार मुक्तीचा संदेश
पथनाट्यातून भ्रष्टाचार मुक्तीचा संदेश

पथनाट्यातून भ्रष्टाचार मुक्तीचा संदेश

sakal_logo
By

अलिबाग, बातमीदार
रायगड जिल्ह्यामध्ये ३१ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर या कालावधीत सतर्कता व जागृकता सप्ताह सुरु करण्यात आला आहे. या सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर गेल इंडिया लिमिटेडच्यावतीने जनजागृती म्हणून पथनाट्याचे आयोजन करण्यात आले. या पथनाट्याच्या माध्यमातून गाव पातळीवर भ्रष्टाचार मुक्तीचा संदेश देण्यात आला.
-----------------------------------------
वेगवेगळ्या सरकारी कार्यालयासह ठिकठिकाणी भ्रष्टाचार वाढत आहे. ही भ्रष्टाचाराची मुळे खोलवर रुजली आहेत. आजच्या तरुण पिढीपर्यंत भ्रष्टाचार मुक्तीचा संदेश देण्यासाठी बेलोशी ग्रामपंचायतीच्या परिसरात पथनाट्य केली जात आहेत. प्रिझम सामाजिक संस्थेच्या माध्यमातून होणाऱ्या या पथनाट्यामध्ये लाच घेणे, भ्रष्टाचार केल्याने देशाच्या विकासावर कसा परिणामावर भाष्य केले जात आहे. या उपक्रमाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून गेल कंपनीच्या माध्यमातून राबवण्यात आलेल्या या उपक्रमाचे बेलोशी ग्रामपंचायतींसह वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांकडून कौतुक करण्यात आले. यावेळी गेल इंडिया लिमिटेड कंपनीचे मुख्य महाव्यवस्थापक व प्रभारी अधिकारी अनूप गुप्ता, महाव्यवस्थापक (मानव संसाधन) जितिन सक्सेना, अॅलवेन इसाखा, कामगार नेते अनंत गोंधळी, बेलोशीचे सरपंच कृष्णा भोपी, भास्कर चव्हाण, प्रभाकर राणे, गिरीश पाटील, राकेश भोपी, भास्कर भोपी, रामचंद्र पारंगे, अजित पिटनाक, परमजीत सिंग, सुभाष वारगे, सदानंद पाटील, नंदकुमार काटले, ग्रामपंचायत कर्मचारी आदी मान्यवर, पदाधिकारी, सदस्य गेल कंपनीचे अधिकारी व कर्मचारी तसेच नागरिक उपस्थित होते.
--------------------