ठाकरे, शिंदे गटात चुरस वाढणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ठाकरे, शिंदे गटात चुरस वाढणार
ठाकरे, शिंदे गटात चुरस वाढणार

ठाकरे, शिंदे गटात चुरस वाढणार

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. २४ : रायगड जिल्ह्यात मुदत संपलेल्या २४० ग्रामपंचायतींच्या निवडणुका १८ डिसेंबरला होणार आहेत. या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी, शेकाप, काँग्रेस पक्षाबरोबर फुटीनंतर वेगळे झालेले बाळासाहेबांची शिवसेना आणि शिवसेना उद्धव ठाकरे हे दोन नवे पक्ष त्याच ताकदीने रिंगणात उतरणार असल्याने निवडणुकांतील चुरस आणखीनच वाढली आहे.

ग्रामपंचायत निवडणुकांनंतर जिल्हा परिषद, पंचायत समित्यांसाठी निवडणुका होण्याची शक्यता असल्याने या निवडणुकांकडे सर्वच राजकीय पक्ष गांभीर्याने पाहत आहेत. आगामी निवडणुकांसाठी ही लिटमस टेस्ट असल्याने रायगडमधील राजकीय वातावरण तापू लागले आहे. यंदा ठाकरे गट आणि शिंदे गट सक्रिय झाल्‍याने चित्र बदलण्याची परिस्थिती सकृतदर्शनी दिसत आहे. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये २४० ग्रामपंचायतींची थेट सरपंच पदासाठीची निवडणूक झाली होती. आगामी रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची ही पूर्वतयारी मानल्यास, सरपंच पदांसह पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या उमेदवारांना मतदार आणि प्रचार यंत्रणांवर सढळ हस्ते खर्च करावा लागण्याची चिन्हे दिसून येत आहेत. मतदार आणि संभाव्य उमेदवारांकडून राजकारणाला वेगळे वळण मिळण्याची शक्‍यताही वर्तवली जात आहे.

थेट सरपंचांसाठी पूर्वीपेक्षा जास्त चुरस आहे. त्याचबरोबर इतर सदस्यही निवडून आणण्यासाठी सरपंच पदाच्या उमेदवाराला प्रयत्न करावे लागतात. त्यामुळे आजच्या घडीला सरपंच पदाची निवडणूक ही सर्वात खर्चिक होत आहे.
- सुशांत पाटील, इच्छुक उमेदवार