राज्यपालांना निलंबित करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राज्यपालांना निलंबित करा
राज्यपालांना निलंबित करा

राज्यपालांना निलंबित करा

sakal_logo
By

पाली, ता. २१ (वार्ताहर) : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाचा सुधागड तालुका उद्धव ठाकरे युवासेना व शिवसेनेने निषेध केला आहे. पालीतील छत्रपती संभाजी महाराज चौकात रविवारी (ता. २०) राज्यपाल कोश्यारी यांचा पुतळा जाळला. तसेच त्यांना तात्काळ निलंबित करावे आणि महाराष्ट्रातून हकालपट्टी करावी, अशी मागणी यावेळी केली.
राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्याला ७२ तास होऊनही महाराष्ट्रातील मुख्यमंत्री आणि बंडखोर ४० आमदारांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही, हे अतिशय निंदनीय आहे, असा तीव्र संताप या वेळी युवासेना व शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. या वेळी ठाकरे गट युवासेना जिल्हा अधिकारी सचिन डोबलळे, सुधागड तालुका अधिकारी किरण पिंपळे, किशोर खरीवले, निखिल खामकर, प्रमोद खोडागळे, ओमकार खोडागळे, प्रथमेश पाटील, सोहम खोडागळे, सूरज गुप्ता, रोहन राऊत, जयंतीलाला भानुशाली आदींसह युवासैनिक, शिवसैनिक उपस्थित होते.