भैरमपाडा येथील तरुणांचा मनसेत प्रवेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भैरमपाडा येथील तरुणांचा मनसेत प्रवेश
भैरमपाडा येथील तरुणांचा मनसेत प्रवेश

भैरमपाडा येथील तरुणांचा मनसेत प्रवेश

sakal_logo
By

पाली, ता. २४ (वार्ताहर) : मनसे अध्यक्ष राज ठाकरे व मनविसे प्रमुख अमित ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होवून सुधागड तालुक्यातील भैरमपाडा येथील अनेक तरुणांनी मंगळवारी (ता. २२) मनसेत जाहीर प्रवेश केला. मनसे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व उपजिल्हा अध्यक्ष संदीप ठाकूर यांच्या सोबतीने सुधागड तालुकाध्यक्ष सुनील साठे यांच्या उपस्थितीत या तरुणांनी मनसेत प्रवेश केला आहे. साठे यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील विविध तरुण व कार्यकर्त्यांनी मनसेचा झेंडा हाती घेतला. तसेच तालुक्यात गाव तिथे शाखा हे मनसेचे अभियान सुरू आहे. मयूर खंडागळे, जगदीश खंडागळे, गणेश खंडागळे, संदीप खंडागळे, कल्पेश खंडागळे, सूरज खंडागळे, मनोहर खंडागळे, तुषार खंडागळे, प्रल्हाद ठोंबरे, कुमार ठोंबरे, आकाश खंडागळे, स्वप्नील खंडागळे, मिलिंद खंडागळे, नवनाथ खंडागळे, मोरेश्वर ठोंबरे, प्रशांत ठोंबरे, मारुती पवार, नामदेव खंडागळे, विशाल मिणमिने, सुबोध शेळके व रजनीकांत ठोंबरे या तरुणांनी मनसेत प्रवेश केला.