बेलोशीतील माजी सैनिकाचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बेलोशीतील माजी सैनिकाचे निधन
बेलोशीतील माजी सैनिकाचे निधन

बेलोशीतील माजी सैनिकाचे निधन

sakal_logo
By

अलिबाग, ता. ४ (बातमीदार) ः तालुक्यातील बेलोशी येथील माजी सैनिक धर्मा रामचंद्र भोपी (८५) यांचे गुरुवारी निधन झाले. भोपी चांगले खेळाडू होते. १९६२ मध्ये भारतीय सैन्य दलात ते रुजू झाले. १९६५ मध्ये झालेल्या भारत-पाकिस्तान युद्ध, १९७२ मध्ये झालेल्या भारत-बांग्लादेश युद्धांमध्ये त्यांचा सहभाग होता. कारकिर्दीत त्‍यांनी सेवा पदक, रक्षा पदक, जीएस पदक व संग्राम पदक अशी पदके मिळविली होती. तसेच कुस्ती, लाठीकाठी, दांडपट्टा, मल्लखांब या खेळांतही ते तरबेज होते. सैन्य दलातून सेवानिवृत्त झाल्यावर सामाजिक क्षेत्रात त्यांनी काम केले. बेलोशी येथील स्मशानभुमीमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मंडळींनी उपस्थित राहून श्रद्धांजली अर्पण केली. धर्मा भोपी यांची उत्तरकार्य ५ डिसेंबर रोजी त्यांच्या राहत्या घरी होणार असल्याची माहिती भोपी कुटुंबीयांकडून देण्यात आली.