पालीत बल्‍लाळेश्‍वराच्या दर्शनासाठी रांगा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पालीत बल्‍लाळेश्‍वराच्या दर्शनासाठी रांगा
पालीत बल्‍लाळेश्‍वराच्या दर्शनासाठी रांगा

पालीत बल्‍लाळेश्‍वराच्या दर्शनासाठी रांगा

sakal_logo
By

पाली, ता. ११ (वार्ताहर) ः बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी रविवारी हजारो भाविक सकाळपासूनच पालीत दाखल झाले होते. दर्शनासाठी लांब रांगा लागल्याने मंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप आले होते. रायगड जिल्ह्यासह, महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांसह मुंबई, ठाणे, पुणे आदी शहरांतील आणि परराज्यातून भाविक व पर्यटक मोठ्या प्रमाणावर पालीत दाखल झाले होते. काही शाळांच्या सहलीही आल्‍या होत्‍या त्‍यामुळे भक्त निवास व हॉटेल फुल झाले होते.
भाविक व स्थानिकांच्या वाहनांमुळे बल्लाळेश्वर मंदिर परिसर, वडेर हायस्कुल, महाकाली मंदिर चौक, बाजारपेठ, गांधी चौक, हाटाळेश्वर चौक वाहतूक कोंडी झाली होती. मात्र वाहतूक पोलिस व देवस्थान ट्रस्टचे सुरक्षारक्षकांनी दिवसभर कार्यरत राहून कोंडी फोडण्याचा प्रयत्‍न केला.

देवस्थान ट्रस्टने भाविकांसाठी विशेष सोयीसुविधा उपलब्ध केल्या आहेत. पिण्याचे शुद्ध थंड पाणी, सुरक्षेसाठी मेटल डिटेक्टर, रांगेत उभे राहण्यासाठी रेलिंग, मांडव व शेड उभारण्यात आले आहे. दोन ठिकाणी मोफत पार्किंगची सुविधा उपलब्‍ध होती.
- जितेंद्र गद्रे, अध्यक्ष, बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्ट

रविवारची सुटी आल्याने संकष्टीनिमित्त असंख्य भाविक पालीत बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी आले होते. मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी होती. त्यामुळे व्यवसाय चांगला झाला.
- अमित वरंडे, व्यावसायिक, पाली