क्रिकेट संघ जाहीर रायगड जिल्ह्याचा 14 वर्षांखालील मुलांचा क्रिकेट संघ जाहीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

क्रिकेट संघ जाहीर
रायगड जिल्ह्याचा 14 वर्षांखालील मुलांचा क्रिकेट संघ जाहीर
क्रिकेट संघ जाहीर रायगड जिल्ह्याचा 14 वर्षांखालील मुलांचा क्रिकेट संघ जाहीर

क्रिकेट संघ जाहीर रायगड जिल्ह्याचा 14 वर्षांखालील मुलांचा क्रिकेट संघ जाहीर

sakal_logo
By

अलिबाग, ता. १२ : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या १४ वर्षांखालील साखळी स्पर्धेकरिता रायगड जिल्ह्याचा संघ निवडण्यात आला आहे. कर्णधारपदी अथर्व नीलेश पाटील याची निवड करण्यात आल्‍याची माहिती रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे संघ अध्यक्ष चंद्रकांत मते यांनी दिली. स्पर्धेला १५ डिसेंबरपासून पुणे येथे सुरवात होणार असून ९ गटात प्रत्येकी ४ संघ असा एकूण ३६ संघांचा समावेश आहे. रायगडचा एफ गटात समावेश आहे. या गटात रायगडसह पुणे जिल्हा क्रिकेट असोसिएशन, जळगाव, सेक्रेटरी ११ हे संघही आहेत.
रायगडचा संघ : अथर्व पाटील (कर्णधार), क्रिश बाहिरा, शौर्या पाटील, पंकज इटकर, शौर्य गायकवाड, आदित्य पांडे, रचित करीया (यष्टीरक्षक), जिग्नेश म्हात्रे, आर्यन निकाळजे, अमय भोसले, यशराज भोसले, रुतुराज पाटील, आर्यक जाधव, आरुष कोल्हे. स्टँड बाय : पार्थ पवार, आराध्य पाटील, मिथीलेश म्हात्रे, नीलेश यादव, श्लोक कोळी, ॠषिकेश पिंपळकर. रिझर्व्ह - रुद्र खोपकर, युवराज ठाकूर, अर्णव पाटील, केदार निसर्ग, आर्यन जाधव