चिवे ग्रामपंचायतीवर शिंदे गटाचे वर्चस्‍व | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिवे ग्रामपंचायतीवर शिंदे गटाचे वर्चस्‍व
चिवे ग्रामपंचायतीवर शिंदे गटाचे वर्चस्‍व

चिवे ग्रामपंचायतीवर शिंदे गटाचे वर्चस्‍व

sakal_logo
By

पाली, ता. १४ (वार्ताहर) ः सुधागड तालुक्यातील चिवे ग्रामपंचायतीवर बाळासाहेबांच्या शिवसेना पक्षाचे सरपंचासह तीन सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत; तर खांडपोली ग्रामपंचायतीवर युतीचे सरपंच व सदस्य बिनविरोध आले आहेत.
बाळासाहेबांची शिवसेना उपजिल्हाप्रमुख अनुपम कुलकर्णी, तालुकाप्रमुख रवींद्र देशमुख यांच्या नेतृत्वाखाली ह.भ.प. नथुराम महाराज वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली चिवे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी रोहिदास साजेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली; तर सदस्यपदी नागेश साजेकर, अंजना वाघमारे व रंजना पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
खांडपोली ग्रामपंचायतीवर भाजप व बाळासाहेबांची शिवसेना युतीच्या सरपंच मानसी नीलेश पालांडे, सदस्या स्वाती समीर परब, सदस्य जितेंद्र यशवंत डाकी हे बिनविरोध निवडून आले. शिंदे गटाने चिवे ग्रामपंचायतवर एक हाती सत्ता मिळवत निवडणुकीत आपले खाते उघडल्‍याची माहिती तालुकाप्रमुख रवींद्र देशमुख यांनी दिली.

पाली ः खांडपोलीच्या सरपंचपदी मानसी पालांडे बिनविरोध निवडणू आल्‍या.