रुग्‍णालयाच्या नवीन इमारतीबाबत कार्यवाही करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रुग्‍णालयाच्या नवीन इमारतीबाबत कार्यवाही करा
रुग्‍णालयाच्या नवीन इमारतीबाबत कार्यवाही करा

रुग्‍णालयाच्या नवीन इमारतीबाबत कार्यवाही करा

sakal_logo
By

अलिबाग, ता. २८ (बातमीदार) ः अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाची इमारत जीर्ण झाली आहे. त्या ठिकाणी नवीन इमारत बांधण्याबाबत तातडीने कार्यवाही करण्यात यावी, अशी आग्रही मागणी शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी मंगळवारी विधानपरिषदेत केली.
जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांसाठी हक्काचे रुग्णालय असणाऱ्या जिल्हा सामान्य रुग्णालयाची दैनावस्‍था झाली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयातील शस्‍त्रक्रिया कक्षाच्या छतातून गळती सुरू आहे. या ठिकाणी एकही शस्त्रक्रिया होत नसल्‍याने गरीब व गरजू रुग्णांना खासगी रुग्णालय तसेच मुंबई, नवी मुंबईतील रुग्णालयाचा आधार घ्यावा लागतो. त्यामुळे सर्वसामान्य रुग्णांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. ही बाब आमदार जयंत पाटील यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली.
शस्‍त्रक्रिया विभागासह रुग्णालयाच्या आवश्यक दुरुस्तीकडे सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचे काम करणे, इमारतीवर आतापर्यंत १५ ते २० कोटींहून अधिक खर्च झाला असूनही इमारत जीर्ण अवस्थेत आहे. निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारावर व संबंधित अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याची आवश्यकता आहे. तसेच कोणतीही मोठी दुर्घटना होवू नये यासाठी राज्य शासनाने नवीन इमारत बांधण्याची आवश्यकता आहे, असे जयंत पाटील यांनी सांगितले.