नवोदयच्या प्रवेशासाठी १५ फेब्रुवारीपर्यंत मुदत

नवोदयच्या प्रवेशासाठी १५ फेब्रुवारीपर्यंत मुदत

अलिबाग, ता. ११ : माणगाव येथील जवाहर नवोदय विद्यालय-निजामपूरमधील सातवी प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेश अर्ज दाखल करण्यासाठी १५ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. निजामपूर येथील जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेश अर्ज स्वीकारण्याच्या मुदतीत वाढ करण्यात आली आहे. याआधी ८ फेब्रुवारीपर्यंत मुदत होती. ती आता १५ फेब्रुवारीपर्यंत करण्यात आली आहे. ऑनलाईन सुधार विंडो १६ आणि १७ फेब्रुवारी रोजी खुली होईल. या सुधार विंडोमध्ये विद्यार्थ्यांचे लिंग (स्त्री/पुरुष), जात प्रवर्ग, विभाग, अपंगत्व आणि परीक्षेच्या माध्यमसंदर्भात काही त्रुटी राहिल्यास बदल करण्याची सुविधा देण्यात येणार आहे. ऑनलाईन प्रवेश अर्ज नवोदय विद्यालय समितीच्या www.navodaya.gov.in किंवा www.cbseitms.rcil.gov.in/NVS या वेबसाईटवर माहितीसाठी आणि ऑनलाईन भरण्यासाठी उपलब्ध आहे, अशी माहिती विद्यालयाचे प्राचार्य के. वाय. इंगळे यांनी दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com