प्रेमाच्या जाळ्यात ओढून आर्थिक लुट करणाऱ्या महिलेसह एकाला अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रेमाच्या जाळ्यात ओढून आर्थिक लुट करणाऱ्या महिलेसह एकाला अटक
प्रेमाच्या जाळ्यात ओढून आर्थिक लुट करणाऱ्या महिलेसह एकाला अटक

प्रेमाच्या जाळ्यात ओढून आर्थिक लुट करणाऱ्या महिलेसह एकाला अटक

sakal_logo
By

अलिबाग, ता. १६ (बातमीदार) : प्रेमाच्या जाळ्यात ओढून लाखो रुपयांची आर्थिक लुट करणाऱ्या महिलेसह एकाला अटक करण्यात आली आहे. मांडवा सागरी पोलिसांनी या दोघांना ताब्या घेऊन त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
धनश्री टावरे रा. माहिम, मुंबई व संजय अरुण सावंत रा. कामार्ले, अलिबाग असे या दोघा आरोपीची नावे आहेत. या दोघांची सोशल मिडीयाच्या माध्यमातून दहा वर्षापुर्वी ओळख झाली. त्यानंतर झालेल्या भेटीतून या दोघांनी अश्‍याप्रकारे आर्थिक लुटीची योजना आखली. संजय हा अलिबाग तालुक्यातील परिसरातील श्रीमंत व्यक्तीचे नंबर धनश्रीला दिला जात होता. या नंबरवर धनश्री सोशल मिडीया अथवा फोनवर संपर्क साधत त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढत होती. त्यानंतर त्यांच्या सोबत अश्‍लिल व्हिडीओ बनवून ते व्हायरल करण्याची धमकी देत लाखो रुपयांची मागणी करत होते.
असाच प्रकार अलिबाग तालुक्यातील आगरसुरे येथील एका बांधकाम व्यवसायिकांबाबत घडला आहे. या प्रकरणी या इसमाने मांडवा पोलिसांना माहिती या प्रकाराची माहिती दिल्याने पोलिसांनी सापळा रचत मुंबई येथील चर्चगेट येथे सदर महिलेला पैसे घेताना ताब्यात घेतले. या गुन्ह्यात संजय याचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याला ही अटक करण्यात आली. या दोघांनी यापुर्वी ही अशी फसवणूक केल्याचे कबूल कले आहे, त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना १८ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

-------
अमिषाला बळी पडू नका
सुंदर मुलीचे आमिष दाखवून जाळ्यात फसवणे आणि आर्थिक लुबाडणूक करणे. हा प्रकार रायगड जिल्ह्यात ही आता समोर येऊ लागला आहे. व्यापारी, काही नेते मंडळी यांना त्यात अडकवण्याचा प्रकार वाढू लागला आहे. कोणाची फसवणूक झाली असल्यास त्यांनी पोलिसांशी संपर्क साधावा. तसेच आशा अमिषाला बळी पडू नका असे आवाहन पोलिसांनी केले आहे.