बारावीची परीक्षा उद्यापासून होणार सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sakal
बारावीची परीक्षा आजपासून सुरू

बारावीची परीक्षा उद्यापासून होणार सुरू

sakal_logo
By

अलिबाग, ता. २० (बातमीदार) ः महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्यावतीने बारावीची लेखी परीक्षा २१ फेब्रुवारीला ते २१ मार्च या कालावधीत जिल्ह्यातील ४६ केंद्रावर होणार आहेत. कला, वाणिज्य, विज्ञान व किमान कौशल्य शाखेतील ३१ हजार २७८ विद्यार्थी लेखी परीक्षा देणार आहेत. पहिल्या दिवशी सकाळी अकरा ते दुपारी दोन या वेळेत इंग्रजी विषयाचा पेपर आहे.
परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी पाच भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यामध्ये प्राथमिक शिक्षणाधिकारी, माध्यमिक शिक्षणाधिकारी उप शिक्षणाधिकारी माध्यमिक, महिला अधिकारी वर्ग एक किंवा दोन, प्राथमिक जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था या भरारी पथकाचा समावेश आहे. यंदा ‘कॉपी मुक्त महाराष्ट्र’ अभियानाच्या माध्यमातून परीक्षा देणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या संशयित हालचालीवर लक्ष ठेवले जाणार आहे.
प्रत्येक तालुक्यात एक पथक नियुक्त केले आहे.